आयुर्वेदिकआरोग्य

किवी फळ खाण्याचे फायदे…

प्रतिनिधी : – नूतन पाटोळे

अँटिऑक्सिडंट्समुळे होतात आजार दूर
किवी फळ म्हणजे अँटिऑक्सिडंट्ससाठी पॉवरहाऊस आहे. काही दिवस तुम्ही रोज जर हे एक फळ खाल्लंत तर तुमच्या आरोग्यासाठी हे लाभदायक आहे. किवीमध्ये असणाऱ्या अँटिऑक्सिडंट्समुळे शरीरातील आजार दूर होतात.
2. विटामिन सी चं प्रमाण आहे जास्त
किवीमध्ये संत्र आणि लिंबू या दोन्ही फळांपेक्षा अधिक प्रमाणात विटामिन सी असतं. त्यामुळे हेल्थ एक्स्पर्टदेखील डाएट फॉलो करताना रोज त्यामध्ये किवीचा समावेश करण्याचा सल्ला देतात. तुम्हाला माहीत आहे का? साधारण 100 ग्रॅम किवीमध्ये 154 टक्के इतक्या प्रमाणात विटामिन सी असतं. जे विटामिन सी चा स्रोत समजण्यात येणाऱ्या संत्र आणि लिंबू या दोन्ही फळांंपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे.
3. प्रतिकारशक्ती क्षमता वाढते
याचबरोबर तुम्ही निरोगी राहण्यासाठी सर्वात गरजेचं असणारं विटामिन ए देखील किवी या फळामध्ये अंतर्भूत असतं. ही दोन्ही विटामिन्स अप्रतिम अँटिऑक्सिडंट्स असून आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी उत्तम उपाय आहे. किवीमध्ये विटामिन सी असल्यामुळे आपली इम्यून सिस्टिम अर्थात प्रतिकारशक्ती क्षमता अधिक चांगली होण्यास मदत होते. तसंच शरीरामध्ये होणाऱ्या इन्फेक्शनपासून वाचण्यासदेखील याची आपल्याला मदत होते.
4. बॅक्टेरियापासून करते संरक्षण
बदलत्या वातावरणानुसार जे बॅक्टेरिया पसरतात त्याने इन्फेक्शन होत असतं. पण किवी त्यापासून संरक्षण करण्यास मदत करतं. तुम्ही तुमच्या रोजच्या डाएटमध्ये किवीचा समावेश करून घेतलात तर तुमची डायजेस्टिव्ह सिस्टिम अर्थात पचनक्रिया मजबूत होऊन आजारांवर मात करण्यासाठी तुमच्या शरीराला अधिक बळ मिळतं. यामुळे शरीरातील टॉक्झिन्स बाहेर निघून जातात.
5. फायबरयुक्त असल्याने ब्लडशुगर नियंत्रणात
किवीमध्ये फायबर असतं आणि फायबरयुक्त पदार्थांचं सेवन केल्याने कार्डिओवॅस्क्युलर आजार, सीव्हीडी अथवा कोरोनरी हार्ट आजार होण्याची शक्यता कमी होते. हाय फायबरयुक्त असल्यामुळे किवी हे रक्तदाब, कोलस्ट्रॉल आणि ब्लडशुगर नियंत्रणात आणण्यासाठी किवी फळ अतिशय फायदेशीर ठरतं.

Spread the love

Related posts

टोमॅटोच्या ज्यूसचे फायदे

admin@erp

फणसाच्या बियांचे फायदे…

admin@erp

पीच खाण्याचे फायदे …

admin@erp