उत्सवदेशपुणेमहाराष्ट्रसांस्कृतिक

काळभैरवनाथ यात्रेनिमित्त मांजरीत विविध कार्यक्रमांचे आयोजन..

प्रतिनिधी :- अशोकआव्हाळे

मांजरी, ता. २७ : मांजरी खुर्द येथील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ व ग्रामदेवतांच्या वार्षिक उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवात विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. त्यासाठी उत्सव समितीकडून विविध प्रकारची तयारी सुरू करण्यात आली आहे.

शुक्रवार (ता.२८ ) श्री काळभैरवनाथ महाराजांना पहाटे महाअभिषेक व महापूजा करण्यात येणार आहे. संध्याकाळी पालखी मिरवणूक व छबिण्याचा कार्यक्रम होणार आहे. दुसऱ्या दिवशी शनिवारी रात्री मंगला बनसोडे यांच्या लोकनाट्य तमाशाचे सादरीकरण होणार आहे. अखेरच्या तिसऱ्या दिवशी रविवारी संध्याकाळी हिंदवी पाटील प्रस्तुत ” हिऱ्याची हिरकणी” हा ऑर्केस्ट्रा संपन्न होणार आहे.

“उत्सवासाठी सर्व मंदिर परिसराची व चौकांची साफसफाई करून मंडप उभारण्याची तयारी सुरू आहे. मंदिरांच्या वर आकर्षक विद्युत रोषणाई व भव्य दिव्य फुलांचे डेकोरेशन करण्यात येणार आहे.करमणुकीच्या कार्यक्रमासाठीचे व्यासपीठ बांधण्यात येत आहे. खेळणी, पाळणे, मिठाईची दुकाने, सजू लागली आहेत. यावेळी कुस्त्यांचा आखाडा भरणार नाही. उत्सव समितीच्या वतीने संपुर्ण कार्यक्रमाचे नियोजन केले जात आहे.’ अशी माहिती माजी सरपंच स्वप्निल उंद्रे यांनी दिली. यावेळी यशवंत सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष किशोर उंद्रे, माजी सरपंच विकास उंद्रे, माजी उपसरपंच प्रकाश सावंत, माजी सरपंच विलास आबा उंद्रे, सिताराम उंद्रे, महादेव उंद्रे, हिरामण गवळी,माऊली उंद्रे, रघुनाथ उंद्रे, धनंजय म्हस्के, भैय्या मुरकुटे, अनिल थोरात, निखिल उंद्रे आदी मान्यवर उपस्थित होते.

Spread the love

Related posts

मलठण नाभिक संघटनेच्या वतीने संत सेना महाराज पुण्यतिथी उत्साहामध्ये संपन्न

admin@erp

शैलेंद्र बेल्हेकर यांना शौर्य समाजरत्न पुरस्कार प्रदान..

admin@erp

माजी सरपंच संजय जगताप यांनी जिल्हा परिषद निवडणूक लढवण्याचे केले आव्हान.

admin@erp