Uncategorizedखेळपुणेफिटनेससामाजिक

एक सायकल… एक संधी : उपक्रमांतर्गत शालेय विद्यार्थ्यांना सायकल उपलब्ध.

शिक्षणासाठी अस्तित्व कला मंचचा आगळावेगळा उपक्रम

प्रतिनिधी :- आशोक आव्हाळे

पुणे ता.१२: भीमाशंकर (ता.खेड) येथील शालेय विद्यार्थी शिक्षणासाठी दररोज पाच ते सहा किलोमीटर पायी शाळेत जात होते. या विद्यार्थ्यांना परिस्थिती अभावी पायपीट करत आपल्या आयुष्याचे शिक्षण पूर्ण करण्याची जिद्द मनात ठेवून हे विद्यार्थी दररोज शाळेत पाय जात होती. या मुलांची परिस्थिती पाहून अस्तित्व कला मंच या समाजभिमुख संस्थेने शिक्षणाच्या वाटेवर चालणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांसाठी एक अनोखा उपक्रम राबवत “एक सायकल, एक संधी” चळवळ सुरू केली आहे. डॉ. अश्विनी शेंडे यांच्या संकल्पनेतून ही चळवळ उभी केली आहे. या दरम्यान भीमाशंकर परिसरातील दौऱ्यात असे लक्षात आले की, अनेक विद्यार्थी दररोज ५-६ किलोमीटर पायपीट करत शाळेत जातात. या वास्तवतेतुन डॉ. शेंडे यांनी ही संकल्पना मांडली. “घरात,सोसायट्यांमध्ये न वापरता पडलेल्या जुन्या सायकली जर गरजू मुलांपर्यंत पोचवल्या, तर त्यांचे शैक्षणिक आयुष्य अधिक सुलभ होईल.” या प्रेरणेतून ‘एक सायकल… एक संधी’ उपक्रमाला सुरुवात झाली. फेसबुकच्या माध्यमातून केलेल्या आवाहनाला समाजातून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनेक दात्यांनी आपापल्या जुन्या पण चालू स्थितीतील सायकली अस्तित्व कला मंचच्या सभासदांनाकडे सुपूर्द केल्या.नागरिकांच्या सहकार्यामुळेच अस्तित्व कला मंचच्या वतीने भीमाशंकर परिसरातील २५ विद्यार्थ्यांपर्यंत सायकली पोचवण्यात यश मिळाले. या विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी सायकल उपलब्ध केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणित झाला. या उपक्रमामध्ये संस्थेचे सहसंस्थापक योगेश गोंधळे, दिपक कुदळे, सुदीप कुदळे, धनश्री कुलकर्णी, रुचिरा जोशी, स्वाती कुदळे, शुभांगी कुदळे यांसह अनेक कार्यकर्त्यांनी आपला मोलाचा सहभाग दर्शविला. या संपूर्ण वितरण व्यवस्थेचे स्थानिक समन्वयक म्हणून मच्छिंद्र जगदाळे यांनी जबाबदारी पार पाडली.अस्तित्व कला मंचचा हा उपक्रम सामाजिक भान, शिक्षणाची जाणीव आणि संवेदनशीलतेचा उत्तम मिलाफ ठरला आहे. संस्थेच्या वतीने हा उपक्रम भविष्यातही अधिक व्यापक स्वरूपात राबवण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

Spread the love

Related posts

मांजरी खुर्द व परिसरात बेकायदा होर्डिंगचा सुळसुळाट

admin@erp

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी प्रकाश जगताप यांची बिनविरोध निवड.

admin@erp

आमदार कटके यांनी घेतली पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांची भेटनगर महामार्गावरील वाहतुक कोंडी व आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर केली चर्चा..

admin@erp