पुणेमहाराष्ट्र

उत्कृष्ट पोलीस पाटील” पुरस्काराने भारती उंद्रे सन्मानित ..

प्रतिनिधी: – आशोक आव्हाळे

मांजरी ता.२: हवेली तालुक्यातील मांजरी खुर्द गावच्या कार्यक्षम पोलीस पाटील व पुणे जिल्हा महिला आघाडीच्या सदस्य भारती दिपक उंद्रे यांना महसूल दिनानिमित्त महसूल व वन विभाग तहसील कार्यालय, हवेली, जि.पुणे यांच्या वतीने “उत्कृष्ट पोलीस पाटील” म्हणून हवेली तालुकाचे प्रांतअधिकारी यशवंत माने यांच्या शुभहस्ते शाल, श्रीफळ ,प्रशस्तीपत्रक व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी कार्यक्रमासाठी हवेलीचे तहसीलदार किरण सुरवसे, नायब तहसीलदार,सर्कल,तलाठी, पोलीस पाटील उपस्थित होते. महाराष्ट्र शासन गृह विभाग शासन निर्णयानुसार गाव पातळीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करणे, पोलीस तपासात अत्यंत गंभीर व इतर गुन्ह्यातील आरोपींची गुप्त माहिती व ठाव ठिकाण काढून त्यांना पकडून देण्यासाठी व गुन्हे उघडकीस आणण्यासाठी मदत करणे, गावातील सण, उत्सव, यात्रा, निवडणुका या सर्वच घडामोडीवर लक्ष ठेवून त्या शांततेत पार पाडणे अशा कामात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल उंद्रे यांना सन्मानित करण्यात आले. मांजरी गावच्या पोलीस पाटील भारती उंद्रे यांनी आपल्या मनोगतात महसूल मध्ये काम करत असताना येणाऱ्या अडचणी बाबत माहिती दिली व तालुक्यातून उत्कृष्ट पोलीस पाटील म्हणून निवड केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.

Spread the love

Related posts

तळेगाव येथे उपद्रवी हुमणी किड प्रतिबंध प्रशिक्षण संपन्न.

admin@erp

क्रांतिकारक विष्णू गणेश पिंगळे यांचे कार्य प्रेरणादायी- डॉ मुसमाडे

admin@erp

यूरो कॅम्पस शिक्रापूर येथे एकादशी महोत्सव — शिक्षण, संस्कृती आणि भक्ती यांचा अद्वितीय संगम

admin@erp