आयुर्वेदिकआरोग्य

उडीद डाळ खाण्याचे फायदे..

प्रतिनिधी : – नूतन पाटोळे

गर्भवती स्त्रियांसाठी फायदेशीर आहेत
उडदाच्या डाळीमध्ये लोहाचे प्रमाण भरपूर असते. म्हणून ही दाळ खाणे गर्भवती महिलांसाठी चांगली असते. कारण लोहामुळे RBCs ( लाल रक्तपेशी) च्या उत्पादनात उत्तेजित करते. शरीराच्या सर्व भागांमध्ये आक्सिजन पोहोचवण्यासाठी आरबीसी फायदेशीर म्हणजे जबाबदार असतात. गर्भवती महिलांनी आपल्या आहारात उडदाचा समावेश केला पाहिजे. नियमीत उडीद डाळीचे सेवन केल्याने गर्भवती महिलांच्या शक्तीमध्ये लक्षणीय वाढ होते.
2. हाडे मजबूत करण्यासाठी फायदा
आपल्या शरीराची हाडे मजबूत असणे अगत्याचे आहे. जेणेकरून तुमच्या शरीराच्या अंतर्गत अवयवांचे संरक्षण करण्याचे काम हाडे करतात व स्नायूंचा आधार देतात. हाडांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आहारात उडीद डाळीच्या समावेश करा. मॅग्नेशियम, लोह, पोटॅशियम, फॉस्फरस आणि कॅल्शियम यांसारख्या खनिजांनी समृद्ध कडधान्ये हाडांच्या दुरुस्तीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. हाडे जोडण्यासाठी मजबूत करण्यासाठी फायदेशीर असलेले खनिज मॅग्नेशियम, लोह, पोटॅशियम, कॅल्शिअम आणि फॉस्फरस उडदाची डाळ व तत्सम कडधान्यांमध्ये भरपूर असतात. हाडाचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी उडीद डाळ महत्त्वाची भूमिका बजावते.
3. त्वचा व केसांसाठी चांगले असते
आपल्या त्वचेचे आणि केसांचे आरोग्य उत्तम असायला हवे असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही आहारात उडदाच्या डाळीचा समावेश करा. कारण सर्वोत्तम दाळी मध्ये उडदाची डाळ उच्च प्रतीची मानली जाते. यात भरपूर खनिजे जीवनसत्त्वे असतात ते त्वचा जळणे म्हणजे त्वचेची आग होत असेल तर शांत करण्यासाठी मदत करते. उडदा मध्ये नैसर्गिक अँटीसेप्टिक गुणधर्म असते ज्यामुळे मुरूम येण्यास कारणीभूत असलेल्या जिवाणूंना मागण्यास मदत करते व सहाजिकच पिंपल्स येणे या त्वचाविकार पासून आपला बचाव होतो.
4. पाचन तंत्र निरोगी ठेवते
पौष्टिकतेचा उत्तम स्रोत म्हणजे उडदाची डाळ. पचन सुधारण्यासाठी हे फायबर मदत करते तुम्हाला बद्धकोष्ठता जुलाब हाता पायाला किंवा शरीरात कुठेही पेटके येणे किंवा फुगण्याचा त्रास असेल तर, या समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी आहारात उडीद डाळीचा अवश्य समावेश करा.
5. हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर
यात मॅग्नेशियम पोटॅशियम सारखे काही महत्त्वाची खनिजे असतात. हे तुमच्या हृदयाचे संरक्षण करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते. हीच खनिजे आपल्या शरीरामध्ये असलेले इतर इलेक्ट्रोलाईट्स म्हणजे कॅल्शियम आणि पोटॅशियम पेशीमध्ये घेऊन जाण्याचे म्हणजे वाहून नेण्याचे काम करते. जेणेकरून कोलेस्टेरॉलची पातळी योग्य ठेवण्यासाठी व हृदय आणि स्वसन प्रणाली निरोगी ठेवण्यासाठी फायदा होतो.
तोंडाला चव नसणे, तोंड वाकडे होणे, दुर्बलता दूर करण्यासाठी, क्षयरोग, लकवा म्हणजे पक्षाघात, अनंद्रव शुल, व इतर वातरोग दूर करण्यासाठी उडदाचे फायदे आहे.

Spread the love

Related posts

मोड आलेले कडधान्य खाण्याचे फायदे…

admin@erp

कडधान्य खाण्याचे फायदे…..

admin@erp

रोज कच्चा कांदा खाण्याचे फायदे.

admin@erp