प्रतिनिधी :- नुतन पाटोळे
ईडलिंबू हे फळ आपल्या आजूबाजूला सहज उपलब्ध होऊन जाते.ईडलिंबूचे आपल्या शरीराला एवढे फायदे आहेत की आपल्या शरीरातील असंख्य आजार या ईडलिंबूचा सेवनाने त्वरित दूर होतात.जर तुम्हाला पित्त ,अपचन, पोटामध्ये गॅस, बद्धकोष्टता यासारख्या समस्या नेहमी उद्भवत असतील तर तुमच्यासाठी ईडलिंबू अगदी वरदान ठरते. ताप ,सर्दी, खोकला, हृद्या संबंधित आजार,लिव्हर संबंधित आजार, मूत्र संदर्भातील आजार म्हणजेच जर तुम्हाला युरिन इन्फेक्शन असेल ,लघवीला वारंवार होत असेल.
तुम्हाला मुतखडा असेल, मुतखडा,पित्ताशयाचा आजार असू दे किंवा किडनी मधील मुतखडा असुदे..कोणत्याही प्रकारचा मुतखडा लवकर बाहेर पडण्यासाठी ईडलिंबू आपल्याला उपयोगी पडतो. गावाकडे या ईडलिंबू बद्दल एक म्हण प्रचलित आहे, जर आपण रात्री या ईडलिंबू मध्ये एक सुई टोचून ठेवली आणि सकाळी ईडलिंबु पाहिला तर त्या सुईचे पूर्णपणे पाणी होऊन जाते एवढी प्रचंड शक्ती या ईडलिंबू मध्ये असते म्हणूनच जर तुम्हाला मुतखडा झाला असेल तर तो मुतखडा विरघळण्यासाठी ईडलिंबूचा मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग केला जातो.
ईडलिंबू मध्ये असे काही औषधे घटक उपलब्ध असतात ,जे आपल्या शरीरातील पित्त वाढू देत नाही. जर तुमचा बीपी वारंवार वाढत असेल, शुगर लेव्हल वाढते, कमी होत नसेल तर अशा वेळी बीपी आणि शुगर लेवल करण्यात ईडलिंबू आपल्याला मदत करतो.
ईडलिंबू चा वापर प्रामुख्याने दोन पद्धतीने करता येऊ शकतो त्यातील पहिला पदार्थ प्रकार म्हणजे आपली ईडलिंबू चे तीन भाग करून हे तीन भाग असे सुद्धा खाऊ शकतो. सालीसकट किंवा लिंबूचा रस काढून तो रस आपण साखरे सोबत पिऊ शकतो त्यानंतर आपल्याला दुसरा उपाय म्हणजे रात्रभर पाण्यामध्ये सागाचे बी भिजवून दुसऱ्या दिवशी लिंबूचा रस तयार करून त्यामध्ये मिसळून सकाळी उपाशीपोटी प्यायल्याने आपल्याला लवकर फरक पडतो.
आणि जर तुमच्या किडनीमध्ये कोणत्याही प्रकारचा मुतखडा असेल तर तो तीन दिवसांमध्ये विरघळून जातो. अशा प्रकारे आपल्याला हा उपाय सातत्याने तीन दिवस करायचा आहे.
हा उपाय केल्याने तुमच्या शरीरातील कोणत्याही प्रकारचा मुतखडा आहे तो लवकरच विरघळून जाईल आणि तुम्हाला आराम पडेल.हा उपाय साधा सोपा असून घरगुती असला तरी त्याचा परिणाम मात्र तेवढाच प्रभावी आहे म्हणून आपले आरोग्य चांगले राखणेकरिता हा उपाय अवश्य करा.