आयुर्वेदिकआरोग्य

आव्हाळवाडी येथील मोफत महाआरोग्य शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

प्रतिनिधी :- अशोक आव्हाळे

मांजरी ता.२९: आव्हाळवाडी (ता.हवेली ) येथे पल्लवी युवराज काकडे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या, सर्वरोग निदान मोफत महाआरोग्य शिबिरास स्थानिक नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला. या शिबिरामध्ये तब्बल 1380 हून अधिक नागरिकांनी सहभाग नोंदविला.

शिबिरादरम्यान 900 नागरिकांची डोळ्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 753 नागरिकांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले. तसेच 47 रुग्णांमध्ये मोतीबिंदूचे निदान झाले असून, या सर्वांवर आगामी काही दिवसांत मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यदूत युवराज काकडे यांनी दिली. याशिवाय 2 नागरिकांना कृत्रिम हात व पाय मिळण्यासाठी नोंद केली.

या आरोग्य शिबिरात हृदय तपासणी, सर्वसाधारण आरोग्य तपासणी, दंत तपासणी, हाडांची तपासणी, स्त्रीरोग तपासणी, ईसीजी, हिमोग्लोबिन, शुगर चाचणी, रक्तदाब मापन तसेच कान-नाक-घसा तपासणी अशा विविध आरोग्य सेवांचा समावेश होता.

पल्लवी युवराज काकडे यांच्या सामाजिक बांधिलकीतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे, आव्हाळवाडी परिसरातील नागरिकांना सर्वसमावेशक आरोग्यसेवा एका ठिकाणी उपलब्ध झाल्यामुळे नागरिकांनी आभार व्यक्त केले.

Spread the love

Related posts

जवसाच्या बियांचे मुख्य फायदे:

admin@erp

काजू खाण्याचे फायदे:

admin@erp

ज्येष्ठ नागरिक संघ शिक्रापूर हाडांचा ठिसूळपणा व डोळ्यांचे मोतीबिंदू तपासणी शिबिर…

admin@erp