पुणेमहाराष्ट्रराजकीय

आव्हाळवाडी थेऊर जिल्हा परिषद गटातुन कोमल आव्हाळे प्रबळ दावेदार…

प्रतिनिधी :- अशोक आव्हाळे.

मांजरी ता.२६: आगामी २०२५ च्या होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आव्हाळवाडी ग्रामपंचायतचे माजी सरपंच तसेच अशोक सहकारी बँकेचे संचालक संदेश सुरेश आव्हाळे यांच्या सुविद्य पत्नी आव्हाळवाडी ग्रामपंचायतच्या विद्यमान सदस्य कोमल संदेश आव्हाळे या प्रबळ दावेदार मानल्या जात आहे. गेल्या चार-पाच महिन्यापासून त्यांनी या निवडणुकीसाठी जबरदस्त तयारी केल्याचे समजते. अनेक सामाजिक कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी आपला जनसंपर्क वाढवला आहे. संदेश आव्हाळे सोशल फाउंडेशनच्या उपक्रमातून अनेकांना मदत केली आहे.गणेशोत्सव, नवरात्रौत्सव व दिवाळी सणाच्या माध्यमातून मतदारांच्या घरापर्यंत संपर्क साधुन त्यांना आपलेसे केले आहे. उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच त्यांनी मतदारांपर्यंत दिवाळी फराळ वाटप उपक्रमातून आघाडी घेतली आहे. संदेश आव्हाळे सोशल फाउंडेशनच्या उपक्रमातून आव्हाळवाडी, मांजरी खुर्द ,कोलवडी ,साष्टे,थेऊर, कुंजीरवाडी व आळंदी म्हातोबाची या गावातील नागरिकांना अयोध्या व काशी विश्वनाथ दर्शन यात्रेचे आयोजन केले आहे.
आव्हाळवाडी गावचे माजी सरपंच संदेश आव्हाळे यांनी आपल्या कार्य कौशल्यातुन जनतेत वेगळी ओळख निर्माण केली आहे. गावाच्या व परिसराच्या जडणघडणीत त्यांचा मोलाचा वाटा आहे. आपल्या सामाजिक कार्याच्या बळावर त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
कोमल आव्हाळे यांनी बोलताना सांगितले की, जनतेचा विश्वास हेच माझे खरे भांडवल आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून मतदार संघाचा विकास करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. लोकांची कामे करण्यासाठी मी राजकारणात सक्रिय सहभाग घेतला आहे. महिला सबलीकरण योजनांच्या माध्यमातून महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
आव्हाळवाडी थेऊर जिल्हा परिषद गटातुन कोमल आव्हाळे यांच्या नावाची चर्चा मोठ्या प्रमाणात होत असुन त्याच या जागेसाठी प्रबळ दावेदार मानल्या जात आहे. जरी पक्षाने उमेदवारी दिली नाही तरी आपण अपक्ष निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Spread the love

Related posts

उत्कृष्ट पोलीस पाटील” पुरस्काराने भारती उंद्रे सन्मानित ..

admin@erp

हडपसर येथे प्लंबर्सना मोफत हेल्मेट वाटप..

admin@erp

मांजरीच्या रेल्वे उड्डाणपूलावर पथदिवे लावा…

admin@erp