प्रतिनिधी :- अशोक आव्हाळे
मांजरी ता.३०: आगामी २०२५ च्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक इच्छुक उमेदवारांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक उपक्रम राबवित आपणच या जागेसाठी प्रबळ दावेदार असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये आव्हाळवाडी थेऊर जिल्हा परिषद गटात ओ बी सी महिला आरक्षण पडल्याने अनेक मातब्बर इच्छुकांची स्वप्न धुळीस मिळाली असल्याने अनेकांनी आपल्या सुविद्य पत्नीला उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न चालू केले आहे. यामध्ये आव्हाळवाडी येथील माजी सरपंच संदेश आव्हाळे यांनी आपल्या पत्नीला या निवडणुकीच्या आखाड्यात उतरवले असुन त्यांनी मतदार संघात अयोध्या,काशी विश्वनाथ दर्शन यात्रेचे आयोजन करुन निवडणुकीपूर्वीच प्रचारात आघाडी घेतली आहे. त्यांनी मतदारांच्या घरापर्यंत संपर्क साधुन या यात्रेसाठी अर्ज भरून घेतले. दिवाळी निमित्त शुभेच्छा भेट देऊन आपणच या जागेसाठी प्रबळ दावेदार असल्याचे सांगत जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
कोमल आव्हाळे यांनी मतदार संघातील गाव वाड्या वस्त्यांवर जात जनसंपर्क वाढवला आहे. कोमल आव्हाळे या आव्हाळवाडी ग्रामपंचायतच्या विद्यमान सदस्य असुन विविध विकासकामांचा अनुभव आहे. महिला सबलीकरण योजनांच्या माध्यमातून महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मतदार संघात त्यांनी अयोध्या काशी विश्वनाथ दर्शन यात्रेचे आयोजन केले असून त्यासंदर्भात संवाद मेळावा व ओळखपत्र वाटप कार्यक्रम थेऊर येथे आयोजित केला होता. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती दर्शविली. हजारोंच्या संख्येने नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिल्याने आव्हाळे यांना नवी उर्जा मिळाली आहे.
राजकीय जाणकारांच्या मते आव्हाळे यांचा प्रचार अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने चालू आहे. त्यामुळे या गटात सध्या तरी वरचष्मा दिसून येत आहे. आजुन तरी त्यांना तेवढा तगडा विरोधी उमेदवार दिसत नाही. त्यामुळे आव्हाळे यांचे सध्या तरी पारडं जड आहे.
