प्रतिनिधी :- आशोक आव्हाळे
मांजरी ता.२० : आव्हाळवाडी (ता. हवेली ) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी हवेली पंचायत समितीचे माजी सभापती नारायण आव्हाळे यांच्या सुविद्य पत्नी पल्लवी आव्हाळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपसरपंच अनुष्का सातव यांनी आपला कार्यकाळ संपल्याने या पदाचा राजीनामा दिला होता त्यामुळे ही जागा रिक्त झाली होती. ही रिक्त जागा भरण्यासाठी सरपंच नितीन घोलप यांनी शुक्रवार (ता.२०) रोजी निवडणूक जाहीर केली. या निवडणुकीसाठी पल्लवी नारायण आव्हाळे यांनी उपसरपंच पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. एकमेव आव्हाळे यांचा उमेदवारी अर्ज आल्याने पल्लवी आव्हाळे यांची सरपंच घोलप यांच्या अध्यक्षतेखाली बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी संजय कालेकर यांनी जाहीर केले. पल्लवी आव्हाळे यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल वाघोलीच्या माजी सरपंच मीना काकी सातव, हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला अध्यक्ष रसिका चोंधे, दर्शना पठारे, माजी सरपंच मंदाकिनी आव्हाळे यांच्या हस्ते आव्हाळे यांचा सन्मान करण्यात आला. गावच्या विकासाच्या कामांमध्ये लक्ष देऊन रस्ते, स्ट्रीट लाईट, नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे नवनिर्वाचित सरपंच पल्लवी आव्हाळे यांनी सांगितले. यादरम्यान पुणे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य रेखा बांदल, सरपंच नितीन घोलप,पंचायत समितीचे माजी सभापती नारायण आव्हाळे, मा सरपंच रामदास आव्हाळे, हवेली पंचायत समितीचे माजी सदस्य सुरेश सातव, भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष गणेश कुठे, हेमंत सातव,प्रवीण आव्हाळे, संदेश आव्हाळे,मंगेश सातव, राहुल सातव, प्रशांत सातव, मंगेश सातव, अविनाश कुटे, योगेश (काका) सातव, नितीन आव्हाळे, नवनाथ सातव यांच्यासह आजी माजी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.