प्रतिनिधी :- अशोक आव्हाळे
मांजरी ता.२४: श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आव्हाळवाडी यांच्या वतीने नवरात्र उत्सव निमित्त नुकतीच दुर्गा माता दौडचे आयोजन करण्यात आले होते. सकाळच्या वेळी या दौडमध्ये भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
ग्रामदैवत खंडोबा मंदिर, निळकंठेश्वर मंदिर, मुख्य रस्ता, श्री दत्त मंदिर व तुळजाभवानी माता मंदिर या पवित्र मार्गाने निघालेल्या या दौडीमध्ये हजारो भाविक, कार्यकर्ते, तरुण व महिला उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.
या दौडीदरम्यान भगवा ध्वज घेऊन कार्यकर्त्यांनी हिंदुत्वाचा जोश दाखवला. महिलांनी घरासमोर सुंदर रांगोळ्या काढून व पारंपरिक पद्धतीने ताट ओवाळून दुर्गामाता दौडीचे स्वागत केले. दत्त विहार परिसरात आबालवृद्ध सहभागी झाले होते.
दौडीतून हिंदू जनजागृती, सामाजिक एकात्मता व सांस्कृतिक परंपरेचे जतन यांचा संदेश देण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यकर्ते, वडजाई दत्त विहार व आव्हाळवाडीतील ग्रामस्थांनी मोठे योगदान दिले.
दुर्गामाता दौडीमुळे संपूर्ण गावात भक्ती, उत्साह आणि एकतेचे अनोखे वातावरण अनुभवायला मिळाले.