प्रतिनिधी :- नूतन पाटोळे
आवळ्याचा रस आपल्याला खोकला, फ्लू आणि तोंडातील अल्सरवर उपचार करण्यासाठी खूप उपयुक्त ठरूतो आणि यामुळे रोग प्रतिकारशक्ती सुध्दा सुधारते.
कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी आवळा ज्यूस मदत करतो, कारण त्यात अमिनो ॲसिडस् आणि अँटीऑक्सिडंट्स असतात जी हृदयाच्या संपूर्ण सुरळीत कामकाजाला मदत करतात.
आवळ्याचा क्षारीय स्वभाव पोट साफ करण्यासाठी आणि पाचक प्रणाली मजबूत करण्यात मदत करतो.
रोज आवळा ज्यूस प्यायल्याने यकृताच्या/लिव्हर च्या तक्रारी कमी होतात. आणि तुमच्या शरीरातून विष बाहेर पडते.
त्यात व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असल्याने, त्यात लोह, कॅल्शियम, फॉस्फरस देखील समृद्ध आहे आणि म्हणूनच संपूर्ण पौष्टिक पेय म्हणून त्याचे सेवन केले जाऊ शकते.
आवळा रसात असणारे अमीनो ॲसिडस आणि प्रोटीन्स मुळे केस गळत असतील तर कमी होतात आणि केस काळेभोर होतात.
*वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे, कारण यामुळे शरीराची अतिरिक्त चरबी कमी होते आणि आपले पोट योग्य प्रकारे साफ होते.