प्रतिनिधी : – नूतन पाटोळे
१) ब्लड प्रेशर:
आहारात अळूच्या पानांचा समावेश केल्याने या पानांमधील पोषक तत्वे शरीरातील रक्तदाब नियंत्रित करतात. या पानांचे सेवन केल्याने तणावाची समस्या देखील होत नाही.
२) डोळ्यांची दृष्टी:
व्हिटॅमिन ए अळूच्या पानांमध्ये भरपूर प्रमाणात असते, जे की डोळ्यांसाठी अधिक फायदेशीर आहे. तसेच डोळ्यांच्या मांसपेशी यामुळे मजबूत होतात.
३) पोटाच्या विकारांवर फायदेशीर:
जर तुम्हाला पोटांच्या कोणत्याही समस्या असतील तर अळूच्या पानाच्या सेवनामुळे पोटाचे त्रास थांबतात, तसेच पचनक्रिया देखील सुरळीत होते.
४) सांधेदुखी:
जर तुम्हाला सांधेदुखीचा त्रास असेल, तर दररोज अळूच्या पानांचे सेवन केल्याने सांधेदुखी थांबू शकते. या पानांच्या सेवनामुळे सांधेदुखीवर आराम मिळतो.
५) वजन कमी करण्यासाठी फायदेशीर:
वजन कमी करण्यासाठी अळूची ही खूप फायदेशीर असतात. या पानांमधले फायबर पचनक्रिया सुधारते. ज्यामुळे वजन नियंत्रणात राहते.