आयुर्वेदिकआरोग्य

आरोग्यदायी राजगिरा..

प्रतिनिधी :- नूतन पाटोळे

• राजगिर्याायत कॅल्शिअम भरपूर असल्याने व लायसीन हे कॅल्शिअम शोषणास मदत करणारे व्हिटामिन असल्याने हाडे मजबूत होतात.
• व्हिटामिन सी भरपूर मात्रेत असल्याने त्वचा, केस यासाठी ऊपयुक्त आहे. हिरड्याच्या विकारात ऊपयुक्त ठरते.
• • राजगिर्या्तील प्रोटिनमध्ये इन्सुलिनवर नियंत्रण राखण्याचा विशेष गुणधर्म आढळतो. त्यामुळे डायबेटिकच्या रुग्णांमध्ये ऊपयुक्त ठरते.
• • राजगिरा ग्लुटेन फ्रि फायबरने युक्त आहे. त्यामुळे वजन कमी करताना उपयुक्त ठरतो.
• • मॅग्नेशिअम अधिक असल्याने मायग्रेनमध्येही ऊपयुक्त ठरते.
• • यातील बायोअॅधक्टीव्ह कंपाऊंड्स हे अँटिअॅ लर्जीक असतात.
• • फायबर्स आणि अन सॅच्युरेटेड फॅट्स असल्यामुळे रक्तवाहिन्यातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करण्यास मदत करते. हृदयाचे स्वास्थ्य राखते.
• • राजगिर्यादचे गुणधर्म –आयुर्वेदामध्ये राजगिर्याकला रूचीवर्धक, रक्तशोधक, स्तन्यवर्धक, मल:सारक म्हटले आहे.
• रूचीवर्धक – त्यामुळे पचनव्याधीनंतर येणारा nausea कमी करण्यास मदत होते.
• रक्तशोधक – त्यामुळे रक्तपित्त, त्वचा विकार, यात ऊपयुक्त ठरतो.
• स्तन्यवर्धक- हा राजगिर्या्चा गुणधर्म सांगितला आहे. म्हणजेच मातृत्वामध्ये स्तनदुग्धाची वृद्धी याच्या नियमित सेवनाने होते.
• मल:सारक – हा राजगीर्यातचा गुण बद्धकोष्ठ, संग्रहणी या व्याधीत उपयुक्त ठरतो.
तसेच स्थौल्य कमी करण्यासाठी आयुर्वेदात रोज राजगिर्याषचे सेवन सांगितले आहे. केस गळणे, केस पांढरे होणे हे विकार राजगिरा सेवनाने टळतात.
हे सर्व गुणधर्म राजगिर्याठची पाने व बियांमध्ये असतात. त्यामुळे राजगिर्यायच्या पानांची भाजी,रस आहारात समाविष्ट करावा.तसेच राजगिरा हा लाडू,पराठे,थालिपीठ, शिरा, खीर अशा अनेक स्वरूपात बनवता येतो.आठवड्यातून एकतरी नाष्ता राजगिर्याहचा खावा. चॉकलेट्सची जागा राजगिर्यााच्या लाडवांनी किंवा चिक्कीने घेतली तर ऊत्तमच!

Spread the love

Related posts

बोरं खाण्याचे फायदे

admin@erp

मध खाण्याचे फायदे..

admin@erp

बाजरी खाण्याचे फायदे ..

admin@erp