प्रतिनिधी : – अशोक आव्हाळे
– एकूण 103 नागरिकांची तपासणी, विविध तपासण्या आणि मोफत औषधोपचार
शिरूर, ता. 09 नोव्हेंबर 2025:
हरे राम हरे कृष्ण सेवा फाउंडेशन (महाराष्ट्र राज्य) आणि स्माईल फाउंडेशन मोबाइल हेल्थ सर्व्हिस युनिट यांच्या संयुक्त विद्यमाने आरणगाव येथे मोफत आरोग्य शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
हे शिबिर वरिष्ठ आरोग्य व्यवस्थापक श्री. नौशाद अहमद यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सामुदायिक आरोग्य अधिकारी श्री. के. एम. सोनटक्के यांच्या नेतृत्वाखाली पार पडले.
या आरोग्य शिबिरात एकूण 103 नागरिकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. नागरिकांना डॉक्टरांच्या सल्ल्याने मोफत तपासणी, औषधोपचार तसेच रक्तदाब, शुगर आणि हिमोग्लोबिन तपासणी या सुविधा देण्यात आल्या.
शिबिरादरम्यान
49 नागरिकांची RBS + HB तपासणी,
29 नागरिकांची रक्तदाब (BP) तपासणी,
तर
27 नागरिकांची शासकीय योजनांतर्गत आभा कार्ड व आयुष्मान कार्ड नोंदणी करण्यात आली.
या उपक्रमाचा उद्देश ग्रामीण भागातील नागरिकांना सुलभ, दर्जेदार आणि मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे हा होता.
ग्रामस्थांकडून या आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. याप्रसंगी प्रमुख उपस्थितीमध्ये व आयोजक शरदराव रासकर सरचिटणीस भाजपा शिरूर तालुका, संस्थापक अध्यक्ष हरे राम हरे कृष्ण सेवा फाउंडेशन कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य, बापूसाहेब काळे मा सरपंच निमगाव म्हाळुंगी,रेश्मा ताई जयेश शिंदे,सौ आणिता तोंडे सरपंच आलेगाव पागा, राजेंद्र मखर ग्रामपंचायत सदस्य, दत्ता शिंदे ,या सर्वांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले बापुसाहेब काळे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले शेवटी स्माईल फाउंडेशन मोबाइल हेल्थ टीमचे व हरे राम हरे कृष्ण सेवा फाउंडेशन शरदराव रासकर संस्थापक अध्यक्ष यांचे सरपंच ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य आणि सर्व सहकार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
