प्रतिनिधी :- निलेश जगताप
पुणे या ठिकाणी आय इ एस एल पुणे 42 वा वर्धापन दिवसा निमित्ताने पुणे अध्यक्ष सुभेदार यशवंत महाडिक मुंबई अध्यक्ष गोपाळ वानखडे, दिल्ली अध्यक्ष ब्रिगेडर इंद्र मोहन सिंग यांच्या व असंख्य सैनिकांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रीय माजी सैनिक किसान महा फेडरेशन महाराष्ट्र राज्य नवनिर्वाचित अध्यक्ष सैनिक नेते शिवाजी अण्णा कदम व तसेच सचिव देविदास साबळे खजिनदार ज्ञानदेव देवखिले यांचा सन्मान अतिशय उत्साह मध्ये थाटामाटा मध्ये करण्यात आला.यावेळेस अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले. यामध्ये प्रामुख्याने प्रस्तावनेमध्ये सुभेदार यशवंत महाडिक, अध्यक्षभविष्य काळामध्ये सर्व महाराष्ट्रातील माजी सैनिक एकसंघ होऊन रस्त्यावरती येऊन मोठे जन आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही व त्यानंतर गोपाल वानखडे म्हणाले की या सर्व मागण्यांना आमचा जाहीर पाठिंबा आहे. आय. इ. एल. एस पुणे यांनी काही मागण्या प्रस्तावने मधून व्यक्त केल्या, यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक संघटना आहेत. परंतु त्या सर्व संघटना विखुरलेले आहे . सैनिक म्हणून जर या सर्व संघटना एकत्रित आल्या तर आपण एक इतिहास निर्माण केल्याशिवाय राहणार नाही.
यामध्ये त्यांनी शासनाकडे अनेक मागण्या आपल्या प्रस्तावनेतून व्यक्त केल्या. त्यामध्ये प्रामुख्याने ग्रामपंचायत सदस्य ते देशाच्या संसदेतील खासदार या पदावर सैनिकाला संधी मिळावी व तसेच महाराष्ट्रामध्ये ज्याप्रमाणे शिक्षक मतदार संघ अस्तित्वात आहे. त्याप्रमाणे सैनिक मतदार संघ निर्माण करावा व तसेच तालुका व जिल्हा पातळीवरती सैनिक भवन उभारावे व एसटी प्रवास करत असताना माजी सैनिकासाठी राखीव सीट ठेवावे ह्या व अनेक मागण्या आमच्या शासन दरबारी त्वरित मान्य कराव्या अन्यथा भविष्य काळामध्ये भारतीय माजी सैनिक संस्था शिरूर व खराडी वडगाव शेरी येथील संघटनेचे सर्व प्रामुख्याने उपस्थित होते. यामध्ये कॅप्टन परशुराम शिंदे, सुभेदार सुरेश उमाप, नंदकिशोर रोडे, लक्ष्मण शिवले, कॅप्टन बाबू जाधव, कॅप्टन हेरंब साळेकर, पोपट पडवळ दादा, चव्हाण सुधाकर पाटील, गोविंदराव चव्हाण, सदाशिव पाटील, विकास चांदारे, मधुकर भोसले, दिलीप कंगाळे, पोपटराव भुजबळ, विवेकानंद घाडगे, अशोक कड, भीमराव आरेकर, शिवाजी नाना कोहकडे, सुदाम भुजबळ, लहू तळवले, भाऊसाहेब सोनवणे, जयसिंग गायकवाड, जालिंदर ढमढरे, आनंदराव ढमढरे, शहाजी धुमाळ,सुनील चौधरी, बाळासाहेब शेवाळे त्यानंतर या कार्यक्रमाचे आभार बाळासाहेब आबनावे यांनी केले. व सर्वात शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. व जय जवान जय किसान सर्व सैनिकांनी नारा दिला.