देशपुणेमहाराष्ट्रराजकीय

आमदार बापूसाहेब पठारे यांना धक्काबुक्की..

प्रतिनिधी :- अशोक आव्हाळे

पुणे ता.६ : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे वडगावशेरीचे आमदार बापूसाहेब पठारे यांना शनिवारी रात्री धक्काबुक्की झाल्याचे समोर आले. पुण्यातील लोहगावमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते बंडू खांदवे यांच्याकडून धक्काबुक्की झाल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेनंतर लोहगाव परिसरात काही वेळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही बाजूच्या जमावाला शांत केल्याने मध्यरात्री १२च्या सुमारास तणाव निवळला.

बापूसाहेब पठारे हे लोहगाव वाघोली रोडवरील गाथा लॅान्स येथील एका माजी सैनिकांच्या सत्काराचा नियोजित कार्यक्रमासाठी गेले होते. याच कार्यक्रमातून लोहगाव ग्रामपंचायतचे माजी सदस्य बंडू खांदवे बाहेर येत असताना आमदार पठारे यांची एन्ट्री झाली. तेथे दोघांमध्ये शाब्दिक वाद पेटला त्यानंतर झटापट झाली. आणि नंतर धक्काबुक्की झाली. ही माहिती मिळताच थोड्याच वेळात मोठा जमाव गाथा लॉन्स परिसरात जमला. मात्र पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतल्याने काहीच वेळात गाथा लॅान्सला छावणीचे स्वरूप आले होते. रात्री उशीरापर्यंत विमानतळ पोलिस स्टेशनला दोन्ही बाजूकडून तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती.

बंडू खांदवे यांनी पत्रकारांशी बोलताना नेमकं काय घडलं ते सांगितलं? ‘मी त्यांना मारहाण केलेली नाही मला मारत असताना ते खाली पडलेले आहेत. तेव्हा त्यांना काय लागलं असेल ते मला माहित नाही. ते आमदार आहेत त्यांना काहीही बोलायचा अधिकार आहे. मला मारहाण झाली आहे जीवे मारण्याची धमकी दिली आहे त्यामुळे मी तक्रार दाखल करणार’, असं देखील बंडू खांदवे म्हणाले आहेत.

दरम्यान, आमदार पठारेंचे चिरंजीव घटनास्थळी पोहचले त्यांनी देखील माध्यमांशी संवाद साधत आपली बाजू मांडली. ‘हा व्यक्ती प्रत्येक निवडणुकीपूर्वी असा काहीतरी स्टंट करतो. त्याचे ३०-४० लोक हुल्लडबाजी करत होते. आमचा ३-४ हजार लोकांचा मॉब जर अंगावर गेला असता तर त्यांची काय अवस्था झाली असती, याचा विचार करा. मात्र, आम्ही संयमाने ही गोष्ट घेतली. हा फक्त एक पॉलिटिकल स्टंट आहे. आता इथे जे मॉब घेऊन आले होते त्या सगळ्यांच्या विरोधात तक्रार दाखल करणार आहोत’ असे सुरेंद्र पठारे म्हणाले आहेत.

Spread the love

Related posts

महावितरणच्या थेऊर शाखेचा ढिसाळ कारभार..

admin@erp

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तारखा होणार लवकरच जाहीर;

admin@erp

क्रांतिकारक विष्णू गणेश पिंगळे यांचे कार्य प्रेरणादायी- डॉ मुसमाडे

admin@erp