प्रतिनिधी :- अशोक आव्हाळे
पुणे ता.७: नियमित व मुबलक पाणी मिळणे’ हा सर्व नागरिक बांधवांचा हक्क आहे आणि तोच जर मिळत नसेल तर याविरोधात आवाज उठवून संघर्ष करून तो हक्क मिळवला पाहिजे. आमच्या हक्काचे पाणी आणि इतर मूलभूत सुविधा आम्हाला मिळाल्याच पाहिजे असे प्रतिपादन आमदार बापूसाहेब पठारे यांनी केले. मंगळवार (ता.७) रोजी याच पाण्याच्या मूलभूत हक्कासाठी पुणे महानगरपालिकेवर ‘धडक मोर्चा’ पठारे यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आला.या दरम्यान, पाणी, रस्ते, आरोग्य, उद्याने, स्मशानभूमी, लोहगाव, वाघोली सह समाविष्ट गावांचा विकास आरखडा इ. संदर्भातील मागण्या पालिका प्रशासनासमोर ठेवल्या .वारंवार पाठपुरावा करूनही संबंधित मागण्या पूर्ण होत नसल्याने महापालिका प्रशासनाचा “दशक्रिया विधी” करून आमदार बापूसाहेब पठारे यांनी निषेध केला. सोबतच काहींनी अर्धमुंडन करून आपला असंतोष व्यक्त केला.
यानंतर आमदार पठारे यांनी पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांना निवेदन देऊन त्यांच्यासमवेत मागण्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या चर्चेदरम्यान, सर्व मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेत तत्काळ उपाययोजना करण्याचे तसेच, मतदारसंघातील विकासकामांचा पाहणी दौरा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. विशेषतः पाणीपुरवठा नियमित करण्यासह गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या पाण्याच्या टाक्यांची कामे जलदगतीने पूर्ण करण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, रस्ते, रुग्णालये, स्मशानभूमी, ड्रेनेज, नालेसफाई, मिळकत कर इ. कामांबाबत तपशीलवार चर्चा केली. मागण्यांच्या संदर्भाने लवकरच प्रत्यक्ष पाहणी करून सर्व प्रलंबित विकासकामे पूर्ण केली जातील, असेही आयुक्तांनी सांगितले.
या आंदोलन प्रसंगी ज्येष्ठ नेते प्रकाश म्हस्के, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक नानासाहेब आबनावे, संतोष भरणे, श्रीमती वसुंधरा उबाळे, श्रीमती मीना सातव, माजी नगरसेवक राजेंद्र शिरसाट,सुनिल मलके, महेंद्र पठारे, हनिफ शेख,डॅनियल लांडगे, संतोष आरडे,भैय्यासाहेब जाधव, संजय देशमुख, श्रीमती रेखा टिंगरे, चंद्रकांत टिंगरे, सचिन भगत,किशोर विटकर, विशाल मलके, राजेंद्र खांदवे, शिवदास उबाळे, माजी उपसरपंच प्रितम खांदवे,ॲड. नानासाहेब नलावडे,सागर खांदवे, श्रीमती शिवानी माने, विक्रांत भोसले, श्रीमती पम्मी परांडे,दत्ता परांडे, संजय गलांडे, ॲड.रेगे, श्रीमती कमल जगदाने,अरुण पठारे, संजय माने,केशव राखपसरे, प्रकाश सोनवणे,अजहर खान, सुभाष ठोकळ,विल्सन चंदेवाल,सुभाष काळभोर, जालिंदर कांबळे, निखिल गायकवाड, संतोष सुकाळे, संकेत गलांडे, निलेश जठार व मतदारसंघातील नागरिक बांधव उपस्थित होते.
