प्रतिनिधी :- निलेश जगताप
शिक्रापूर : – आज पीएमश्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिक्रापूर मध्ये आधार फाउंडेशन तर्फे स्कॉलरशिपच्या विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार समारंभाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून श्री राजेंद्र टिळेकर सर विस्तार अधिकारी चाकण बीट आधार फाउंडेशनचे अध्यक्ष श्री सुभाष मामा खैरे केंद्रप्रमुख म्हणून नव्याने निवड झालेले श्री अनिल पलांडे सर केंद्रप्रमुख लंघे सर शाळेचा मुख्याध्यापिका सौ साधना शिंदे मॅडम आधार फाउंडेशनच्या उपाध्यक्ष सौ पल्लवी हिरवे शालेय व्यवस्थापन समिती माजी अध्यक्ष गणेश गायकवाड सदस्य पत्रकार निलेश जगताप राहुल ऐवळे शिक्रापूर शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष श्री चंद्रकांत मांढरे सचिनजी भोसले सतीश तायडे राजेंद्र पाखरे मुखई आश्रम शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सुरेश चव्हाण सिंधुताई जाधव असिफ तांबोळी सर्व मान्यवर उपस्थित होते.

शाळेतील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना व मार्गदर्शक शिक्षकांना ट्रॉफी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला सन्मान करण्यात आलेले, मार्गदर्शक शिक्षक पुढील प्रमाणे सौ रंजना भिवरे मॅडम मधुमालती गोडसे मॅडम सुशीला तांबे मॅडम संजया मांडगे मॅडम सारिका गुंजाळ मॅडम मंगेश येवले सर सत्कारमूर्ती विद्यार्थी पुढीलप्रमाणे नवोदय साठी निवड झालेल्या सोहम जुनगरे राज्य गुणवत्ता धारक विद्यार्थी श्रेयस उगले आशु कुमार कटियार यश पवार हर्षवर्धन करे आईंशा आलमेल प्रद्रयुम धुपे अक्षदा गायकवाड रुद्र वीर राठोड सजेल लवांडे आर्या शिंदे राज पवार श्रेयस अडसूळ निशा कांबळे शाहबाज तांबोळी कृष्णा जाधव संस्कृती पांढरे तनिष्का पाटील ज्ञानेश्वरी जगताप मल्हारी हिरमुखे या सर्व विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.
सुभाष मामा खैरे यांना आधार फाउंडेशन कार्याची माहिती दिली तसेच सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या व चाकण बीटचे विस्तार अधिकारी राजेंद्र टिळेकर यांनी अध्यक्षीय भाषणात सर्व विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे कामाचे कौतुक केले तसेच शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन टाकळकर सरांनी केले व आभार पडवळ सरांनी मानले.
