अध्यात्मआरोग्य

अष्टांग योग..

अष्टांग योगाचा उपयोग

प्रतिनिधी :- नूतन पाटोळे

योगाङ्गानुष्ठानादशुद्धिक्षये ज्ञानदीप्तिराविवेकख्यातेः। (प.यो.द. २/२८)

अर्थ: योगाच्या अंगाचे अनुष्ठान (प्रयोग, क्रियात्मक रूप) केल्याने अशुद्धीचा नाश झाल्यावर ज्ञानाचा प्रकाश, विवेक ख्यातीपर्यंत पसरतो.

स्पष्टीकरण : योगाच्या पुढे देण्यात आलेल्या आठ अंगांचे अनुष्ठान केल्याने, म्हणजेच त्यांना आचरणात आणल्याने चित्तातून मल नष्ट होऊन ते पूर्णपणे निर्मळ होऊन जाते. त्या वेळी योग्याच्या ज्ञानाचा प्रकाश विवेक ख्याती (सात प्रकारांतील सर्वोच्च अवस्था असलेली प्रज्ञाबुद्धी) पर्यंत पसरतो. म्हणजेच, त्याला बुद्धी, अहंकार आणि इंद्रिये यांपासून संपूर्ण भिन्न असलेल्या आत्म्याचे स्वरूप दिसते.

अष्टांग योगाचे कार्य आणि महत्त्व

अधिक सखोल विचार केला, तर योगाची आठ अंगे ही सर्वसामान्य कार्ये करत नाहीत; तर ऋषिमुनींचे हे खूप मोठे, श्रेष्ठ ज्ञान आहे. त्यांनी आपल्यावर मोठीच कृपा केली आहे आणि ही आठ अंगे स्वतंत्रपणे सांगून त्यांना पुन्हा एका माळेच्या स्वरूपात गुंफून आपल्याला त्यांची माहिती दिली आहे. कारण, या सर्व आठही अंगांची कार्ये भिन्न आहेत. आपल्या पायाच्या नखापासूनच्या सर्व अवयवांवर काम करण्यापासून आपल्याला मोक्षाचा रस्ता दाखवण्यापर्यंतची कार्ये ती करतात. त्या महान आत्म्यांनी आपल्याला दिलेली ही एक खूप मोठी भेट आहे. आपल्यासाठी आणि या संपूर्ण विश्वासाठीच ही एक मोठी लाभदायक बाब आहे, आपल्याला झालेली ही मोठी प्राप्ती आहे. ती आत्मसात करून आपण त्यांच्याविषयी कृतज्ञता का व्यक्त करू नये ?

अष्टांग योगाची आठ अंगे (यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी).

१. ‘यम’: हे अंग आपल्याला अनुक्रमे सामाजिक आणि धार्मिक रूपाने जगण्याविषयीची शिकवण देते. त्यामुळे, आपल्या सामाजिक मूल्यांमध्ये वाढ होते. नैतिक

२. ‘नियम’ : आपल्या संपूर्ण जीवनाची कार्यपद्धती बदलून टाकतो. हे अंग आपले चरित्र उज्ज्वल बनवते आणि आपल्याला शिस्तबद्धपणे राहण्यास शिकवते.

३. ‘आसन’ : जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत आपल्याला निरोगी ठेवते. आपल्या शरीराचा उत्तरोत्तर विकास करते.

Spread the love

Related posts

बेला फुलांचे फायदे..

admin@erp

अंजीर फळांचे मानवी आहारातील महत्व.

admin@erp

उडीद डाळ खाण्याचे फायदे..

admin@erp