पुणेमहाराष्ट्रशैक्षणिक

अरूणदादा बेल्हेकर युवा राष्ट्रनिर्माण संस्थेच्या वतीने पुरंदर तालुक्यातील काळदरी शाळेतील मुलांना वह्या पेन वाटप…

प्रतिनिधी : – अशोक आव्हाळे

सासवड ता.२ : शालेय अभ्यासक्रमा बरोबर मुलांना आईवडिलांनी व शिक्षकांनी जे चांगले संस्कार दिलेले असतात त्याचे रोज आचरण करावे त्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्त्वात नम्रता येते असे अरूणदादा बेल्हेकर युवा राष्ट्रनिर्माण संस्थेचे अध्यक्ष शैलेंद्र बेल्हेकर यांनी सांगितले.
पुरंदर तालुक्यातील काळदरी गावातील श्री केदारेश्वर विद्यालय व ज्युनि.कॉलेज मध्ये अरुणदादा बेल्हेकर युवा राष्ट्रनिर्माण संस्थेच्या वतीने वह्या पेन वाटप तसेच विद्यार्थी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी बेल्हेकर बोलत होते व्यासपिठावर शशिकला कुंभार, सुरेश दबडे, प्रभावती हरिभक्त, मुख्याध्यापक विजय चिकणे उपस्थित होते.
बेल्हेकर पुढे म्हणाले डोंगरी भागातील शाळेत शिकणारी मुले धाडसी व निर्भीड असतात त्यांना अभ्यासासाठी योग्य मार्गदर्शन मिळाले तर स्पर्धा परीक्षेत यशस्वी होतात अशा भागात जाऊन गुणवत्ता वाढीसाठी विद्यार्थ्यांशी वारंवार संवाद साधला तर त्यांचा आत्मविश्वास वाढल्या शिवाय राहणार नाही असे त्यांनी सांगितले कार्यक्रमाचे संयोजन दीपक डांगमाळी, प्रविण लांडगे यांनी केले.

Spread the love

Related posts

पोटच्या गोळ्याला फेकुन पसार झाली आई, महिला पोलिस बनल्या दायी

admin@erp

नशा मुक्ती जनजागृती अभियान एक महत्त्वाचे अभियान: सर्जेराव कुंभार..

admin@erp

मांजरी खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत

admin@erp