प्रतिनिधी :- अशोक आव्हाळे
मांजरी ता.८: रक्षाबंधन हा बहिण भावाच्या पवित्र नात्याचा सण आपण व्यसनमुक्ती जनजागृतीची शपथ देऊन साजरा करूया असे अरुणदादा बेल्हेकर युवा राष्ट्रनिर्माण संस्थेचे अध्यक्ष शैलेंद्र बेल्हेकर यांनी सांगितले.
साडेसतरा नळी येथील ज्ञानप्रबोधिनी माध्यमिक विद्यालयात अरुणदादा बेल्हेकर युवा राष्ट्रनिर्माण संस्थेच्या वतीने एक राखी व्यसनमुक्ती जनजागृतीची हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी बेल्हेकर बोलत होते. यादरम्यान मुख्याध्यापिका स्मिता वाघ, कल्पना कोल्हे, दिलवरसिंग पावरा, दिपाली कांबळे,वैशाली गद्रे,रामदास मावळे,सदाशिव कोरे,विजय महाजन,सुरेश गवांदे, विमल घोडके उपस्थित होते. विद्यालयातल्या मुलींनी हातामध्ये फलक घेऊन परिसरात घोषणा देत व्यसनमुक्ती जनजागृतीचा संदेश देणारी फेरी काढली.
शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये व्यसनांचे प्रमाण खूप वाढले आहे. या सर्व विद्यार्थ्यांनी व्यसनाच्या आहारी जाऊन आपलं भवितव्य धोक्यात येईल असे वागू नये म्हणून एक राखी व्यसनमुक्ती जनजागृतीची हा उपक्रम आम्ही राबविला आहे शाळेतील मुलींनी रक्षाबंधनाच्या सणाचे औचित्य साधून सर्व भावांनी निर्व्यसनी राहावे म्हणून एक राखी व्यसनमुक्ती जनजागृतीची ही शपथ रक्षाबंधनाच्या निमित्ताने आपल्या भावांना द्यावी त्यांचं भावी आयुष्य निरोगी निर्व्यसनी राहावं हा संकल्प त्यांच्याकडून राखीच्या ओवाळणीच्या भेट स्वरूपात घ्यावा हा या उपक्रमा मागचा प्रमुख उद्देश आहे असे बेल्हेकर यांनी सांगितले.