प्रतिनिधी :- भगवान खुर्पे
तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर ) :- येथील पुण्यश्लोक श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकातील अमरज्योत मित्रमंडळाच्या गणपतीची विधिवत पूजा,आरती व प्रतिष्ठापना शिक्रापूरचे पोलीस निरीक्षक दिपरत्न गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. या मंडळाचे साधारण आठ फुटी आकर्षक रंगवलेली श्री गणेश मूर्ती भक्तांचे लक्ष वेधून घेत आहे. यावेळी अध्यक्ष राजेंद्र केदारी,माजी अध्यक्ष पांडुरंग नरके, पोपट भुजबळ,ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र भुजबळ, उद्योजक नवनाथ भुजबळ, मधूकर भुमकर,आरपीआयचेअध्यक्ष नवनाथ कांबळे, पोलीस पाटील पांडुरंग नरके, दत्तात्रेय दरवडे,संजय शिंदे,सतिष ढमढरे ,उद्योजक चंद्रकांत भुजबळ, महादेव झळके, तानाजी खुरपे,विलास भुजबळ, निलेश भूमकर आदी उपस्थित होते.
तळेगाव पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी नृत्य,कलाविष्कार स्पर्धेचे मंडळांनी आयोजन केले आहे.लहान गट व खुला गट असे दोन गटात विभागणी करून विद्यार्थ्यांना पारितोषिक व मानचिन्ह देण्यात येणार आहे असे मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र केदारी यांनी सांगितले.