प्रतिनिधी :- अशोक आव्हाळे
पुणे ता.१६: पुण्यातील नवले पूल परिसरात झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर अपघात थांबविण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे. तशा उपाययोजना सुरू आहेत; परंतु अपघात होऊ नयेत याकरिता करावयाच्या अल्पकालीन उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी विविध प्रमुख यंत्रणांच्या अधिकाऱ्यांसह बैठक घेतली. यावेळी सतत होणारे अपघात रोखण्यासाठी तातडीने करावयाच्या उपाययोजनांची जबाबदारी संबंधित यंत्रणांवर निश्चित केली त्यानुसार अल्पकालीन उपाययोजना त्वरित अमलात आणण्याच्या स्पष्ट शब्दांत यंत्रणांना सूचना केल्या असल्याचे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.
पुण्यातील सर्किट हाऊस येथे शनिवारी (ता.१५) रोजी तातडीची बैठक मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी आमदार भीमराव तापकीर, महापालिका आयुक्त नवलकिशोर राम, पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पीएमआरडीएचे आयुक्त योगेश म्हसे, पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी संजय कदम, प्रादेशिक परिवहन अधिकारी व अन्य उपस्थित होते.
यामध्ये जिल्ह्यातील सहकारी व खासगी साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला आहे. मोजक्याच कारखान्यांनी पहिली उचल जाहीर केली आहे.पघात टाळण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना सुरू असून त्या अनुषंगाने जांभूळवाडी ते वडगाव या भागात विविध उपाययोजना करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या रस्ता सुरक्षा समितीची बैठक ठरल्याप्रमाणे नियमितपणे होऊन सेवा रस्त्यांचे रखडलेले काम त्वरित पूर्ण झाले पाहिजे. यासोबतच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने वडगाव पुलाच्या रुंदीकरणाचे काम तातडीने सुरू करण्याच्या स्पष्ट सूचना मोहोळ यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
खरंतर नवले पूल परिसरात अपघात कमी करण्यासाठी जांभूळवाडी ते वारजे रिंग रोड आणि जांभूळवाडी ते रावेत उन्नत मार्ग हा कायमस्वरूपी उपाय आहे. त्यानुसार पीएमआरडीएच्या वतीने जांभूळवाडीपासून ते वारजेपर्यंत रिंगरोडचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे काम सुरू असून त्या कामाला गती द्यावी. उन्नत कॉरिडॉरचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) पूर्ण झाला आहे. त्यामुळे हा अहवाल लवकरात लवकर मंजूर व्हावा यासाठी योग्य तो पाठपुरावा करून राज्य मंत्रिमंडळ आणि केंद्रीय मंत्रीमंडळासमोर मान्यतेसाठी सादर करणार असल्याचे मोहोळ यांनी सांगितले.
कोणत्या अल्पकालीन उपायोजना होणार :
👉 स्पीड गन्सची संख्या तीनऐवजी सहापर्यंत वाढवावी.
👉 वाहनांची वेगमर्यादा प्रतितास ६० ऐवजी ३० किमी करावी.
👉 रस्त्यावरील रिफ्लेक्टर्सची संख्या वाढवावी.
👉 पीएमपीने अधिकृत बसथांबे उभारावेत.
👉 सर्व यंत्रणांनी आपापल्या हद्दीतील सेवारस्त्यांवरील अतिक्रमणे त्वरित काढून घ्यावीत.
यासोबतच प्रादेशिक परिवहन विभागामार्फत खेड शिवापूर टोलनाक्यावर जड व अवजड वाहनांतील अतिभार (ओव्हरलोड), ब्रेक तसेच इतर तांत्रिक बाबींची तपासणी करून जड व अवजड वाहनांनी नियमांचे उल्लंघन केल्यास पुढच्या टोलनाक्यावर दंड करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.
