पुणेमहाराष्ट्रराजकीय

अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर, निवडणुकीची संभाव्य तारीख आली समोर, ३ टप्प्यांत होणार मतदान…

प्रतिनिधी :- अशोक आव्हाळे

पुणे ता.७ : महाराष्ट्रातील नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाले असून, दिवाळीनंतर निवडणुका लागण्याची चिन्हे दिसत आहेत. नोव्हेंबर ते जानेवारीदरम्यान तीन टप्प्यांत मतदान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिका निवडणुका अनुक्रमे नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीत होणार असल्याची माहिती मिळाली आहे.
सोमवारी राज्यातील नगरपालिका, नगरपंचायतींच्या अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले. पुढील तीन ते चार दिवसात मनपा महापौर पदासाठीचे आरक्षण जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे दिवाळीनंतर राज्यात कोणत्याही क्षणी निवडणुका लागण्याचे संकेत मिळाले आहे. नोव्हेंबर ते जानेवारी दरम्यान तीन टप्प्यांत मतदानाची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

महाराष्ट्रात येत्या 15 ते 20 नोव्हेंबरदरम्यान नगरपरिषद निवडणुका होण्याची शक्यता आहे. तर 15 ते 20 डिसेंबरदरम्यान जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होऊ शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिलीय…तर महानगरपालिकेच्या निवडणुका या पुढील वर्षात 15 जानेवारीपर्यंत होण्याची शक्यता आहे. सर्व महापालिकांसाठी एकाच दिवशी मतदान होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.

Spread the love

Related posts

चित्रकार सातारकर यांच्या विस्परिंग नेचर चित्र प्रदर्शनाला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..

admin@erp

पीएमआरडीए च्या प्रस्तावित टी पी स्कीम ला मांजरी खुर्द येथील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध….

admin@erp

दहाव्या विश्व आयुर्वेदिक दिनानिमित्त वनस्पतीचे वाटप व वृक्षरोपण…

admin@erp