प्रतिनिधी अशोक आव्हाळे
मांजरी ता.१५: पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयात महाविद्यालयाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष सुरेश घुले, उपाध्यक्ष माजी प्राचार्य महादेव वाल्हेर, खजिनदार सुनील बनकर उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितीन घोरपडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.यामध्ये माजी महापौर वैशाली बनकर यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश प्रतिनिधी म्हणून निवड झाल्याबद्दल, पत्रकार कृष्णकांत कोबल यांचे यांचे प्रतिष्ठित अशा भारतीय कृषी संशोधन परिषदेने कृषी आणि फलोत्पादन या महत्त्वपूर्ण क्षेत्रात त्यांच्या पत्रकारितेत दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल प्रमाणपत्र देऊन सन्मान झाल्याबद्दल, डॉ. शंतनू जगदाळे यांची महाराष्ट्र शासनाच्या युवा धोरण समितीवर सदस्यपदी तसेच हडपसर विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल, कुसुमवंदन या नाट्यसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद रणनवरे यांची अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या हडपसर शाखेच्या अध्यक्षपदी तसेच पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या चिटणीसपदी निवड झाल्याबद्दल, प्रा. नितीन लगड यांची अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद हडपसर शाखेच्या प्रमुख कार्यवाहपदी तसेच पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सांस्कृतिक विभागाच्या शहर कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल, कु. स्नेहल कांबळे यांची पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल, अमर तुपे हडपसर विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल, यांची अमोल दुगाणे यांची अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या हडपसर शाखेच्या खजिनदारपदी निवड झाल्याबद्दल महाविद्यालय व माजी विद्यार्थी संघ यांच्यावतीने सत्कार करण्यात आले. महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी हे महाविद्यालयाची संपत्ती असून त्यांच्या कार्यकर्तृत्वाने महाविद्यालयाच्या नावलौकिकात भर पडत असते असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितीन घोरपडे यांनी व्यक्त केले. माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष सुरेश घुले यांनी माजी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून घेतला जाणाऱ्या उपक्रमाविषयी विषयी माहिती सांगितली. यावेळी प्रा.नितीन लगड, प्रमोद रणनवरे, कृष्णकांत कोबल, वैशाली बनकर, माजी प्राचार्य महादेव वाल्हेर यांनी मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. प्रशांत मुळे, उपप्राचार्य अनिल जगताप, उपप्राचार्य गजाला सय्यद, डॉ. लतेश निकम, डॉ. गंगाधर सातव आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अनिल जगताप यांनी केले तर आभार सुनील बनकर यांनी मानले.
