प्रतिनिधी :- अशोक आव्हाळे
मांजरी ता.१०: पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयात वंदे मातरम गीतास १५० वर्ष पूर्ण होत असल्याने वंदे मातरम गीताचे सामूहिक गायन आयोजित करण्यात आले होते. वंदे मातरम हे गीत दिनांक ७ नोव्हेंबर १८७५ रोजी अक्षय नवमीच्या दिवशी लिहिले गेले होते. सदर गीत भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या काळात देशभक्ती, एकता, आणि मातृभूमी प्रेमाचे प्रतीक ठरले होते. हे गीत आपल्या राष्ट्रगीताप्रमाणेच आदराचे स्थान ठरले. तसेच देशभक्तीची प्रेरणा देणारे म्हणूनच ओळखले जात होते. यावर्षी वंदे मातरम गीतास १५० वर्ष पूर्ण होत असल्याने शासन निर्णयानुसार ७ नोव्हेंबर २०२५ रोजी अण्णासाहेब मगर महाविद्यालयात इयत्ता ११ वी आणि इयत्ता १२ वी च्या कला,वाणिज्य, विज्ञान,व्यवसाय अभ्यासक्रम या सर्व विद्यार्थ्यांकडून सामूहिक वंदे मातरम या गीताचे गायन करण्यात आले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे आणि कनिष्ठ विभागाच्या उपप्राचार्य प्रा. गजाला सय्यद मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. तसेच क्रीडा शिक्षक प्रा. समीर कुंभार आणि सर्व कनिष्ठ विभागाचे प्राध्यापक उपस्थित होते.
