पुणेमहाराष्ट्रराजकीयसंपादकीयसामाजिक

अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या हवेली तालुका अध्यक्ष पदी बापूसाहेब कंद तर उपाध्यक्षपदी सचिन उंद्रे

प्रतिनिधी : – अशोक आव्हाळे

मांजरी ता.५: अखिल भारतीय वारकरी मंडळ हे महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यासह देशातील विविध राज्यांमध्ये वारकरी सांप्रदायचे गेल्या अनेक वर्षापासून संघटनात्मक कार्य करत आहे. अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ‌.प. प्रकाश महाराज बोधले यांच्या मार्गदर्शनाखाली व पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष ह.भ.प. संतोष काळोखे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतेच पुणे जिल्ह्यातील हवेली तालुका कार्यकारणी नियुक्तीपत्र प्रदान सोहळा कार्यक्रम पार पडला. वाघोली येथील श्रेयस मंगल कार्यालयात (दि.3) रोजी हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात श्री विठ्ठल रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर महाराज,जगद्गुरु संत तुकाराम महाराज, छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी हवेली तालुका अध्यक्ष पदी बापूसाहेब कंद, उपाध्यक्ष सचिन बापूसाहेब उंद्रे, सचिव पोपट आव्हाळे तर कोषाध्यक्ष सोमाजी भंडारे यांची निवड करण्यात आली असून मान्यवरांच्या शुभहस्ते त्यांना नियुक्ती प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
बापूसाहेब कंद, सचिन उंद्रे, पोपट आव्हाळे व सोमाजी भंडारे हे सर्व गेली अनेक वर्षांपासून सातत्याने सामाजिक, धार्मिक, संप्रदाय कार्यक्रमातुन समाज प्रबोधन करतात. तसेच वारकऱ्यांचे प्रश्न शासन दरबारी मांडुन त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करत असतात.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मुक्ताजी दादा नाणेकर यांनी भूषविले. हवेली तालुका कमिटीच्या वतीने सर्व मान्यवरांचा वारकरी उपरणे, टोपी व गुलाब पुष्प देऊन स्वागत हवेली तालुका सचिव पोपट महाराज आव्हाळे यांनी केले.महाराष्ट्र राज्याचे प्रदेश उपाध्यक्ष ह.भ.प. आनंद महाराज तांबे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. या दरम्यान पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष दत्तात्रय महाराज सुरजकर, माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे, अनंता कटके, हवेली पंचायत समितीचे माजी सभापती नारायण आव्हाळे, बाजार समितीचे माजी सभापती रोहिदास उंद्रे, शांताराम कटके, मिना काकी सातव यांनी मनोगत व्यक्त केले. पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष संतोष काळोखे यांनी मार्गदर्शन केले.
पुणे जिल्ह्याचे सचिव संदीप बोत्रे यांनी सुत्रसंचलन करून उपस्थितांचे आभार मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Spread the love

Related posts

भांबर्डे येथे जिल्हा परिषद शाळेत वह्या वाटप…

admin@erp

नागपंचमी निमित्त विद्यार्थ्यांमध्ये सापांविषयीची जनजागृती..

admin@erp

45 वर्षांत पहिल्यांदाच मेमध्ये उजनी प्लसमध्ये

admin@erp