आयुर्वेदिकआरोग्य

अंजीर फळांचे मानवी आहारातील महत्व.

अंजीरचे फायदे
• अंजीरमध्ये फायबर घटक मुबलक असल्याने पोट साफ होण्यास मदत होते. ताजे आणि सुकवलेले अंजीर दोन्हींमुळे बद्धकोष्ठ्तेचा त्रास आटोक्यात ठेवण्यास मदत होते.
• अंजीरमुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी आणि रक्तशुद्धीसाठी पिकलेले अंजीर खावे. कारण अंजीर हे थंड असते.
• जागरण, रात्रपाळी, अति चहा किंवा धूम्रपान, दारू यामुळे शरीराला नुकसान पोहोचतं म्हणूनच शरीराची ही हानी भरून काढण्यासाठी रोज ताजे अंजीर खावे.
• अंजीर फळातील औषधिगुणामुळे पित्त विकार, रक्तविकार व वात ही दूर होतात.
• अंजीरमध्ये ओमेगा 3 आणि ओमेगा 6 घटक मुबलक असतात. त्यामुळे हृद्याचे आजार आटोक्यात राहण्यास मदत होते.
• पायांना भेगा पडल्या असतील तर कच्च्या अंजीराचा चीक लावल्यास भेगा लवकर भरून येतात.
आजारपणामुळे अशक्तपणा खूप जाणवत असेल तर अंजीर खावे. आठवड्याभरात अशक्तपणा कमी होऊन शरीरास शक्ती प्राप्त होते.
• अंजीरमध्ये कॅल्शियम घटक मुबलक असल्याने हाडांना मजबुती मिळते.
• अंजीरमधील पोटॅशियम घटक रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात.
• अंजीरमुळे शक्ती, उर्जा वाढते सोबतच एजिंगचा त्रास कमी करण्यास मदत करतात.
• अंजिराचे सेवन लो किंवा हाय ब्लडप्रेशर असणाऱ्या व्यक्तींसाठी फायद्याचे आहे. अंजीरामध्ये पोटॅशियम मुबलक प्रमाणात असून, हा क्षार रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करीत असतो. ज्यांच्या शरीरामध्ये या क्षाराची कमतरता आहे, त्यांनी नियमितपणे अंजीराचे सेवन करायला हवे.
• अंजीरामध्ये कॅल्शियम मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे ज्यांना सांधेदुखी किंवा ओस्टीयोपोरोसीस सारख्या हाडांशी निगडीत व्याधी आहेत, त्यांनी अंजीराचे नियमित सेवन करावे. त्यामुळे हाडे ठिसूळ होऊन कमकुवत होण्याच्या प्रक्रीयेला अवरोध निर्माण होईल.
• अंजीर या फळाप्रमाणेच त्याची पाने ही गुणकारी आहेत. अंजीराची पाने पाण्यामध्ये उकळून घेऊन हे पाणी प्यायल्याने शरीरातील ट्रायग्लिसराइड्स ची मात्रा नियंत्रित राहते. शरीरामध्ये मोठ्या प्रमाणावर चरबी साठविली जाते, त्याला ट्रायग्लिसराइड्स म्हणतात. जर ह्याची मात्रा शरीरामध्ये वाढली, तर लठ्ठपणा, हृदयरोग इत्याधी व्याधी उद्भवू शकतात.
• ताजे अंजीर सालीसकट खाल्ल्याने अधिक फायदा होतो. त्यामध्ये अधिक प्रमाणात फायबर घटक असतात. रात्री झोपण्याच्या वेळेस 2 अंजीर खाणं अधिक फायदेशीर आहे.
• अंजीरामध्ये फायबर मोठ्या प्रमाणावर असून त्यामुळे पचनशक्ती चांगली राहण्यास मदत होते. तसेच अंजीर खाण्याने अधिक फायबरची मात्रा पोटामध्ये जात असून त्यामुळे पोट अधिक काळ भरलेले राहून भूक लागण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे ज्यांना वजन कमी करायचे असेल, त्यांनी अंजीरे खावीत.

Spread the love

Related posts

गवती चहा पिण्याचे फायदे…..

admin@erp

दुधात मध मिसळून पिण्याचे फायदे…

admin@erp

हरभऱ्याचे फायदे..

admin@erp