पुणेमहाराष्ट्र

हरे राम हरे कृष्ण सेवा फाउंडेशन माध्यमातून आलेगाव पागा येथे वारकऱ्यांचा सन्मान करण्यात आला…

प्रतिनिधी : – निलेश जगताप

आलेगाव पागा तालुका शिरूर जिल्हा पुणे येथे राजेंद्र निंबाळकर सौ मिनाताई निंबाळकर यांच्या निवासस्थानी दादासाहेब बोत्रे वय वर्षे 81, बबनराव जाधव वय 73 , सदाशिव आवचर वय 85 , बबनराव जगताप वय 74 या वारकऱ्यांना भोजन देण्यात आले. तसेच यांचा श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला तसेच यांना ओवळण्यात आले , तसेच यांचे पाय पुजन करून दर्शन घेण्यात आले,आतिथी देव भव , आपल्या घरी आलेल्या पाहुणे मंडळी तसेच वारकऱ्यांना भोजन देणे व यांचा सत्कार करणे, ही आपली परंपरा आहे गेली 40 वर्षावहुन अधिक पायी प्रवास करणारे हे वारकरी मांडवगण फराटा ते आळंदी एकादशीसाठी हा प्रवास असतो ,संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा उत्पत्ती एकादशी आळंदी यात्रा या साठी पाच ते सहा दिवस हा प्रवास मांडवगण फराटा ते कामठे वाडी, कामठे वाडी ते टाकळी फाटा, टाकळी फाटा ते बुरके गाव,बुरके गाव ते पेरणे गाव,पेरणे गाव ते मरकळ,मरकळ ते आळंदी असा हा एकुण 90 ते 100 किलोमीटर प्रवास साधारण दररोज 15 ते 20 किलोमीटर हा प्रवास हे वारकरी पायी करत आहेत. पांडुरंगाच्या व संत ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज , संत शिरोमणी सावता महाराज,संत एकनाथ महाराज,संत नामदेव महाराज अशा प्रकारे अनेक संत महात्मा यांच्या नामस्मरणात किती ताकद आहे. हे यातुन दिसुन येते वय वर्ष 80 हून अधिक होऊन सुद्धा हे वारकरी दररोज वीस किलोमीटर पायी चालत असतात ,वाटेत चालत असताना सतत पांडुरंगाच्या नामस्मरणात दंग झालेले वारकरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल , संत ज्ञानेश्वर महाराज की जय , जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय सर्व संतांकी जय,असे अनेक अभंग मनोभावे मनत ही दिंडी आळंदी मद्धे जाते या वारकऱ्यांचे आम्हास सर्वांना दर्शन लाभले आणि आम्ही धन्य झालो , तसेच यशस्वी साखर कारखान्याचे उद्योजक बाबुराव धोत्रे पाटील यांचे वडील दादासाहेब धोत्रे पाटील यांची देखील यावेळी भेट झाली हे या पायी दिंडी मद्धे सहभागी होते,या प्रसंगी प्रमुख उपस्थितीमध्ये शरदराव रासकर सरचिटणीस भाजपा शिरूर तालुका, संस्थापक अध्यक्ष हरे राम हरे कृष्ण सेवा फाउंडेशन कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य,सौ सुवर्णा रासकर प्रतिनिधी पाणी पुरवठा संस्था आलेगाव पागा, राजेंद्र निंबाळकर,सौ मिना ताई निंबाळकर आदी मान्यवर उपस्थित होते अशी माहिती शरदराव रासकर सरचिटणीस भाजपा शिरूर तालुका यांनी दिली आहे.

Spread the love

Related posts

जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण जाहीर

admin@erp

आव्हाळवाडी थेऊर जिल्हा परिषद गटात तुल्यबळ लढत;

admin@erp

माजी आदर्श सरपंच बापूसाहेब बबनराव काळे यांना “महाराष्ट्र कीर्ती पुरस्कार 2025”

admin@erp