आरोग्यपुणेमहाराष्ट्रसामाजिक

संत निरंकारी मिशनद्वारे रक्तदान शिबिर संपन्न..

प्रतिनिधी :- अशोक आव्हाळे

मांजरी ता.२२: सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने संत निरंकारी सत्संग भवन,मांजरी बुद्रुक येथे संत निरंकारी मिशनच्या अंतर्गत आव्हाळवाडी सेक्टरच्या वतीने आव्हाळवाडी,मांजरी बुद्रुक, लोणी काळभोर, उरुळी कांचन,केशवनगर, हिंगणगाव,वाडे बोल्हाई.संत निरंकारी चेरिटेबल फाउंडेशनद्वारा विशाल रक्तदान शिबिराचे आयोजन रविवार (ता.२०) रोजी करण्यात आले होते. परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन २०० रक्तदात्यांनी रक्त दान केले.
या शिबिराचे उदघाटन ताराचंद करमचंदानी (झोनल प्रमुख, पुणे), पी डी सी बँकेचे संचालक सुरेश घुले, अजित घुले यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. या वेळी संत निरंकारी मंडळाचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संत निरंकारी मिशनद्वारे बाबा हरदेव सिंहजी महाराज यांनी मानवतेला संदेश दिला कि ‘रक्त नाल्यांमध्ये नाही, नाड्यांमध्ये वाहिले पाहिजे’. संत निरंकारी मिशनच्या अनुयायांनी हा संदेश निश्चितपणे अमलात आणला असून आज वर्तमान काळात सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या निर्देशानुसार निरंतर पुढे नेला जात आहे.
संत निरंकारी मिशन द्वारा मांजरी परिसरामध्ये मानवतेच्या कल्याणार्थ वेळो-वेळी अनेक जनसेवेचे उपक्रम आयोजीत करण्यात येतात, ज्यामध्ये मुख्यतः स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, निशुल्क आरोग्य तपासणी ,नेत्र चिकित्सा शिबीर तसेच महिला सशक्तीकरण, बाल-विकास, नैसर्गिक संकटांच्या वेळी सहायता यांसारख्या कल्याणकारी योजनांचे आयोजन केले जाते. यासारख्या सर्व सामाजिक कार्यासाठी भारत सरकार तसेच राज्य सरकारांद्वारे मिशनला वेळोवेळी सन्मानित करण्यात आले आहे.
रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी संत निरंकारी सेवादल, मिशन चे अनुयायी यांचे विशेष योगदान लाभले. दरम्यान रक्तदान जागृती जनसामान्यांमध्ये व्हावी यासाठी मांजरी परिसरात घरोघरी जाऊन रक्तदानाचा संदेश पोहोचविण्यात आला.आलेल्या सर्व रक्तदात्यांचे व मान्यवरांचे आभार दत्तात्रय सातव (आव्हाळवाडी सेक्टर प्रमुख) यांनी मानले. अवनीत तावरे (क्षेत्रीय संचालक, पुणे सीटी) यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सेवादलानी आपले योगदान दिले. रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी पुणे झोन मधील आव्हाळवाडी सेक्टर चे संयोजक,मुखी,सेवादल , स्वयंसेवकांनी योगदान दिले.

Spread the love

Related posts

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात मांजरी खुर्दने पटकाविला दुसरा क्रमांक.

admin@erp

आव्हाळवाडी ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी पल्लवी आव्हाळे…

admin@erp

समुंद्रादेवी दाभाडे यांच्या स्मरणार्थ शालेय गणवेश वाटप

admin@erp