पुणेप्रवाससामाजिक

शारदा सोशल फाउंडेशनच्या वतीने महिलांसाठी उज्जैन यात्रेचे आयोजन : अजित घुले

प्रतिनिधी : – अशोक आव्हाळे

मांजरी ता.१४ : पुणे महापालिका हद्दीतील प्रभाग क्र. १५ मधील मायबाप जनतेला अध्यात्मिक,धार्मिक समाधान मिळावे तर समाजात ऐक्य व एकात्मतेचा संदेश जावा या हेतूने अजित घुले मित्र परिवार व शारदा सोशल फाउंडेशनच्या वतीने महिलांसाठी मोफत उज्जैन महाकाल यात्रेचे आयोजन करण्यात आले असून त्या यात्रेनिमित्त पुर्व तयारी मेळावा आयोजित करण्यात आला होता.
मांजरी, केशवनगर, साडेसतरा नळी आणि शेवाळवाडी या भागातील महिला भगिनींसाठी पुणे मनपा नगरसेवक अजितआबा घुले मित्र परिवार यांच्या वतीने ५००० महिला भगिनींसाठी मोफत उज्जैन दर्शन यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
या यात्रेच्या पूर्वतयारी सोहळ्याचे आयोजन कलाश्री लॉन्स, घावटे नगर, मांजरी येथे मोठ्या उत्साहात पार पडले. या मेळाव्याला उस्फुर्तपणे हजारोंच्या संख्येने माता-भगिनी उपस्थित होत्या. या मेळाव्याला उदंड प्रतिसाद मिळाल्याने अजित घुले यांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी प्रत्येक यात्रेकरू महिलेस त्यांच्या यात्रेसाठी आवश्यक असलेले ओळखपत्र वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे महिलांमध्ये अपार आनंद आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले.नगरसेवक अजित आबा घुले मित्रपरिवार तसेच शारदा सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या यात्रेचे सर्वत्र कौतुक होत आहे. समाजातील महिला भगिनींना धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्राशी नाळ जोडणाऱ्या या सुंदर उपक्रमाबद्दल सर्व यात्रेकरूंनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले.

माय बाप जनतेच्या आशीर्वादाने उज्जैन महाकाल दर्शनासाठी सर्वसामान्य जनता जनार्दनास घेऊन जाण्याचे माझे स्वप्न पूर्ण होत आहे. जनतेचे प्रेम आणि मायेची शिदोरी सोबत घेऊन आम्ही या प्रवासाला जाणार असल्याचे स्विकृत नगरसेवक अजित घुले यांनी सांगितले.

Spread the love

Related posts

सत्यशोधक डॉ.हरी नरके पुरस्काराने प्रा.अशुतोष ढमढेरे सन्मानित

admin@erp

तळेगाव सोसायटीचा लाभांश खातेदारांच्या खात्यात जमा

admin@erp

बांधकाम विभागाने घेतली बातमीची दखल..

admin@erp