पुणे

वाढदिवसाचा खर्च टाळून अनाथाश्रमास मदत..

प्रतिनिधी :- अशोक आव्हाळे

मांजरी ता.२५: कुंजीरवाडी येथील उद्योजक स्वप्निल मेमाणे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त अनाठायी खर्चावर नियंत्रण करुन महालक्ष्मी एज्युकेशन सोसायटी पुणे, संचालित मातोश्री रमाबाई आंबेडकर प्राथमिक व माध्यमिक निवासी आश्रमशाळा कुंजीरवाडी, थेऊर आश्रम शाळेची सध्याची गरज पाहता मुलांना लागणाऱ्या अत्यावश्यक वस्तू म्हणजेच ग्रीन बोर्ड, वही, पेन, गणवेश अशा विविध वस्तू देऊन व खाऊ वाटप करून या विद्यार्थ्यांबरोबर आपला वाढदिवस साजरा केला.यावेळी चिमुकले आनंदाने भारावून गेले होते. स्वप्निल कुंजीर मित्र परिवाराच्या वतीने आगामी काळात चिमुकल्यांना नेहमीच आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे कुंजीर यांनी सांगितले.या दरम्यान प्रमोद काळभोर,अमोल गाढवे,शेखर आप्पा काळभोर, संतोष काळभोर,वैभव मेमाणे, सचिन गाढवे, तुषार वाघुले, परेश राखपसरे व हवेली व दौंड तालुक्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
वाढदिवसाचा खर्च टाळून अनाथ आश्रमाला मदत करणे हा एक लोकप्रिय सामाजिक उपक्रम बनला आहे. जिथे लोक अनाठायी खर्च करण्याऐवजी अनाथ मुलांना शालेय साहित्य, अन्नदान किंवा आर्थिक मदत करतात, ज्यामुळे गरजू मुलांना आधार मिळतो आणि तरुणांसाठी एक चांगला आदर्श निर्माण होतो. अनेकदा नागरिक वाढदिवसाच्या दिवशी अनाथाश्रमास भेट देऊन मुलांसोबत विरंगुळा करतात. त्यांना जेवण देतात आणि आवश्यक वस्तूंचे वाटप करतात जसे की स्वप्निल कुंजीर यांनी केले.

Spread the love

Related posts

थेऊर येथील चिंतामणीच्या मंदिरात भाविकांची अलोट गर्दी…

admin@erp

मी समाजासाठी कार्यरत असताना आपल्या सर्वांसाठीच कोविड-19 काळ खूप कठीण होता..

admin@erp

विजयस्तंभ अभिवादन २०२६ च्या पुर्वतयारीची पोलीस प्रशासनाचे वतीने बैठकीचे आयोजन.

admin@erp