अध्यात्मपुणेमहाराष्ट्रसांस्कृतिक

वाघेश्वर प्रवेश द्वाराच्या चौकटीसाठी २२लाखाचे दान.

१८ किलो चांदीतून प्रवेशद्वाराची चौकट

प्रतिनिधी :- अशोकआव्हाळे

वाघोली ता. ३० : श्रावणी सोमवार निमित्त वाघोली येथील जागृत देवस्थान असलेल्या वाघेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या चौकटीला १८ किलो चांदी पासून मुलामा चढवला जाणार असून याची किंमत २२ लाख रुपये आहे.वाघेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या चौकटीला चांदी चा मुलामा लावण्यासाठी वाघोलीतील वाघेश्वराच्या भक्ताकडून हे दान देण्यात आले आहे.यावेळी रामदास विठ्ठल सातव,बाळकृष्ण मोतीलाल धुत,मोहन अशोक सातव,गणेश बाळासाहेब सातव यांच्याकडून वाघेश्वराच्या चरणी हे दान अर्पण करण्यात आले आहे.यावेळी वाघेश्वर देवस्थानचे ट्रस्ट राजेंद्र सातव पाटील,लोणीकंद चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज हांडे यांच्याकडे वाघेश्वर भक्तांनी हे दान अर्पण केले आहे. याप्रसंगी विशाल शहाजी सातव,प्रतीक रामदास सातव,नयन देविदास कदम,रोहित वसंत सातव,मारुती बबन सातव,अश्विनी पांडे व इतर भाविक भक्त उपस्थित होते.

Spread the love

Related posts

गुजर प्रशालेतर्फे हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांना विनम्र अभिवादन.

admin@erp

तळेगाव ढमढेरे महाविद्यालयाचे राज्यस्तरीय स्पर्धेत यश !

admin@erp

मांजरी परिसरात योग दिन साजरा..

admin@erp