खेळपुणेमहाराष्ट्रशैक्षणिकसामाजिक

राष्ट्रीय क्रिडा दिन आण्णासाहेब मगर महाविद्यालयात साजरा

दिनांक : 2022-09-18    प्रतिनिधी – अशोक आव्हाळे


मांजरी खुर्द:
हडपसर पुणे येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या आण्णासाहेब मगर महाविद्यालयात राष्ट्रीय क्रिडा दिनानिमित्त विविध क्रिडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते . यामध्ये पिस्तुल शूटिंग, बुद्धिबळ, टेबल टेनिस, अशा विविध स्पर्धा पार पडल्या. विद्यार्थ्यांनी या खेळात मोठ्या प्रमाणात भाग घेऊन आपले प्राविण्य दाखविण्याचा प्रयत्न केला. या स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाच्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ यावेळेस पार पडला. राष्ट्रीय क्रिडा दिनानिमित्त घेण्यात आलेल्या स्पर्धांचा बक्षीस समारंभ व्हाॅलीबाॅलचे आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक देविदास रामचंद्र जाधव यांच्या शुभहस्ते व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंडित शेळके यांच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. पंडित शेळके हे होते. या स्पर्धेतील पारितोषिक प्राप्त खेळाडूंना मान्यवर पाहुणे देविदास जाधव व प्राचार्य डॉ. पंडित शेळके यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. संजीव पवार तर आभार प्रदर्शन प्रा. प्रितम ओव्हाळ यांनी केले.

या स्पर्धेत विजेते खेळाडु स्पर्धेनिहाय, प्रशासकीय वृंद

पिस्तुल शूटिंग मध्ये प्रथम क्रमांक: संदीप पोपट शिंदे, व्दितीय: राहुल ईश्वर जाधव.

बुद्धिबळ : प्रथम : संदीप पोपट शिंदे , व्दितीय :अमोल संपतराव कचरे.

टेबल टेनिस: प्रथम: सचिन ईश्वर उरसळ, व्दितीय: अमोल संपतराव कचरे.

कनिष्ठ महाविद्यालयीन वृंद : पिस्तुल शुटिंग ,(महिला गट ) प्रथम: मुल्ला इरफान शब्बीर, व्दितीय: मंजुषा अशोक भोसले.

पुरुष गट: प्रथम: भागवत दशरथ भराटे,व्दितीय: विलास निवृत्ती शिंदे.

बुद्धिबळ ( पुरुष गट): प्रथम: मारुती जयवंत खैरे,व्दितीय :संजीव बाळकृष्ण पवार.

टेबल टेनिस( पुरुष गट ):प्रथम:संजीव बाळकृष्ण पवार,व्दितीय: मारूती जयवंत खैरे.

वरिष्ठ महाविद्यालय वृंद: पिस्तुल शूटिंग (महिला गट )
प्रथम: मनिषा नारायण जगदाळे, व्दितीय: शितल रमेश जगताप.

पुरुष गट: प्रथम: प्रितम रमेश ओव्हाळ, व्दितीय: श्रीकृष्ण गोविंद थेटे.

बुद्धिबळ( पुरुष गट): प्रथम: धीरजकुमार जयप्रकाश देशमुख,व्दितीय :सचिनकुमार सुमतीलाल शहा.

टेबल टेनिस( पुरुष गट): प्रथम: धिरजकुमार जयप्रकाश देशमुख, व्दितीय: प्रतिक अंदाज कामठे
Spread the love

Related posts

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल…

admin@erp

पीएमआरडीए च्या प्रस्तावित टी पी स्कीम ला मांजरी खुर्द येथील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध….

admin@erp

मांजरी खुर्द आणि परिसरात धुंवाधार पाऊस

admin@erp