पुणेसंपादकीय

“राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांना संसदरत्न पुरस्कार..

प्रतिनिधी : – अशोक आव्हाळे

पुणे ता.२९ : राज्यसभा खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांना संसदेतील सर्वोत्तम कामगिरीसाठी ‘संसदरत्न’ या नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते महाराष्ट्र सदन येथे आयोजित सोहळ्यात या पुरस्कारांचे वितरण झाले. प्रसंगी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, केंद्रीय कायदा व न्याय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल आदी उपस्थित होते.

प्राईम पॉइंट फाऊंडेशनच्या वतीने दरवर्षी लोकसभा आणि राज्यसभेतील उल्लेखनीय कार्याबद्दल खासदारांना ‘संसदरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यंदा १७ खासदारांना या पुरस्काराचा मान मिळाला. राज्यसभेची पहिलीच टर्म असलेल्या डॉ. मेधा कुलकर्णी यांनी संसदेत सक्रिय सहभाग नोंदवत सर्वच आघाड्यांवर उल्लेखनीय आणि लोक-देशहिताचे मुद्दे मांडत प्रभावी कामगिरी केली. सर्वोत्तम कामगिरीसाठी डॉ. कुलकर्णी यांचा गौरव करण्यात आला. यंदा राज्यसभेतील प्रभावी कामगिरीसाठी निवड झालेल्या खासदारांमध्ये डॉ. मेधा कुलकर्णी यांचा समावेश झाल्याने महाराष्ट्रासाठी आणि विशेषतः पुण्यासाठी ही गौरवाची बाब ठरली आहे.

मेधा कुलकर्णी यांनी महिला आरोग्य, ग्रामीण विकास, शिक्षण, सामाजिक न्याय, वक्फ बोर्डाच्या संबंधित विषयांवर संसदेमध्ये सातत्याने मुद्देसूद भाष्य केले आहे. नुकत्याच झालेल्या अधिवेशनात त्यांनी ग्रामीण भागातील महिलांमध्ये वाढत चाललेल्या कर्करोगाच्या प्रमाणाबाबत चिंता व्यक्त करत प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी केली होती. तसेच नवीन शिक्षण धोरणासंबंधित काही सूचना केल्या होत्या.

“हा सन्मान केवळ माझा नाही, तर जनतेच्या अपेक्षा संसदेत प्रभावीपणे मांडण्याच्या प्रयत्नांचा गौरव आहे.
पक्षातील शीर्षस्थ नेतृत्व, संसदेतील माझे सहकारी, भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी – कार्यकर्ते, पुणे व महाराष्ट्रातील जनता, तसेच सतत प्रोत्साहन आणि आशीर्वाद देणाऱ्या सर्व हितचिंतकाचे, माझ्या पाठीशी उभे राहणाऱ्या माझ्या घरातील सर्वांचे मनःपूर्वक आभार मानते असे पुरस्कार स्वीकारताना डॉ. मेधा कुलकर्णी म्हणाल्या.

Spread the love

Related posts

बँकेचे शटर तोडून प्रवेशही केला मात्र रिकाम्या हाताने परतले.

admin@erp

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल…

admin@erp

UK growth figures raise chance of rate rise

admin@erp