अध्यात्मआयुर्वेदिकआरोग्य

योग : दक्षतेचे उपाय/नियम..

प्रतिनिधी :- नूतन पाटोळे

यो गाभ्यास सुरू करण्याआधी साधकांनी बरेचसे नियम पाळण्याकडे आणि दक्षता राखण्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता असते. म्हणूनच, प्रत्येक साधकाने खाली दिलेल्या गोष्टी नक्कीच लक्षात ठेवल्या पाहिजेत. ज्याप्रमाणे बांधलेली इमारत कित्येक दिवस स्थिर आणि मजबूत राहावी यासाठी घराची उभारणी करण्याच्या वेळी त्याचा पाया मजबूत बनवण्याकडे आपण विशेष लक्ष पुरवतो, त्याप्रमाणेच जर योगक्रियांविषयक नियम आणि दक्षता यांचे आपण जीवनात पालन केले, तर आपल्या जीवनात येणाऱ्या कित्येक कठीण गोष्टींवर आपोआपच उपायही योजले जातात आणि त्या दूर होतात.

अभ्यासाची पद्धत

एखाद्या योग्य प्रशिक्षकाच्या देखरेखीखालीच योगासने आणि योगाच्या क्रियांचा अभ्यास केला पाहिजे.

कोणतेही योगासन केले, तरी मूळ स्थितीत परत जाण्याच्या वेळी ज्या क्रमाने आसन धारण करण्याची क्रिया केली असेल, त्याच्या उलट क्रमाने आसन सोडण्याची क्रिया करावी.

योगाभ्यास क्रमाक्रमाने आणि क्रियात्मक रूपाने (प्रत्यक्ष क्रिया करून) केला, तर त्याचा अधिक लाभ होतो.

योगासन तसेच योगक्रिया करताना अभ्यास एकाग्रतेने करावा.

कोणाचे केवळ पाहून योगक्रिया करू नयेत आणि कोणालाही त्या दाखवण्यासाठीही करण्याचा प्रयत्न करू नये.

Spread the love

Related posts

गुलबक्षी (Mirabilis jalapa) ही एक औषधी वनस्पती असून तिची फुले, पाने आणि मुळे अनेक रोगांवर उपयोगी पडतात, जसे की जखमा भरणे,

admin@erp

जवसाचे फायदे:

admin@erp

कमळाच्या फुलाचे फायदे

admin@erp