उत्सवमहाराष्ट्र

” मांजरी परिसरात वाजत गाजत जल्लोषात घरोघरी गणरायाचे आगमन..”

प्रतिनिधी :- अशोक आव्हाळे

मांजरी ता.७: मांजरी व परिसरात पारंपरिक व अतिशय साध्या पद्धतीने वाजत गाजत मंगलमय वातावरणात बाप्पाच्या जयघोषात घरोघरी गणरायाचे आगमन झाले. सकाळी पाऊसाची संततधार सुरू होती तरी गणेश भक्तांचा उत्साह कमी झाला नव्हता. दिवसभर गावातील गणपती स्टॉल वरती गणेश भक्तांची गणपतीची मूर्ती खरेदी करण्यासाठी लगबग सुरू होती. श्री गणेशाच्या प्रतिष्ठापनेसाठी दुपारचा व सायंकाळचा मुहूर्त असल्याने गणेश भक्तांमध्ये लगबग सुरू होती. सकाळी ११ च्या सुमारास सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्तींची गावातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली होती. दुपारच्या शुभमुहूर्तावर गावातीला मानाच्या श्री चिंतामणी मित्र मंडळाची व सायंकाळी आदर्श मित्र मंडळ, शिवक्रांती मित्र मंडळ, थोरात ग्रुप,वाघजाई मित्र मंडळ,व इतर मंडळांनी श्री गणेशाची प्रतिष्ठापना केली. दिवसभर घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणरायाची मनोभावे पूजा करत प्रतिष्ठापना केली. यावेळी युवक महिला, अबालवृद्धांचा आनंद ओसंडून वाहत होता. हा उत्सव साजरा करण्यासाठी मागील अनेक दिवसांपासून मांजरी व परिसरात गणेशाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू होती.

Spread the love

Related posts

मलठण नाभिक संघटनेच्या वतीने संत सेना महाराज पुण्यतिथी उत्साहामध्ये संपन्न

admin@erp

तळेगाव ढमढेरे सरपंचपदी स्वाती लांडे बिनविरोध

admin@erp

पुण्यात प्रभाग रचना बदलली जाणार, कशी असणार नवीन रचना? आज येणार महत्त्वाची अपडेट.

admin@erp