Uncategorized

मांजरी खुर्द येथील मुळा मुळा नदी वरील लहान ब्रिज व स्मशानभूमी गेली पाण्याखाली..

प्रतिनिधी :- अशोक आव्हाळे

मांजरी ता. २० : मांजरी खुर्द येथील मुळा मुळा नदी वरील लहान ब्रिज व स्मशानभूमी पाण्याखाली गेली आहे. मुळा मुठा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्याने मांजरी परिसरातील सबमर्सिबल पुलासह इतर ठिकाणी पाणी घुसले आहे. मुळशी,पवनानगर, पानशेत, वरसगाव टेमघर या धरण परिसरामध्ये व पुणे परिसरात दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने ओढे नाले तुडुंब भरून वाहू लागले. त्याचप्रमाणे खडकवासला धरणातून साधारण ४० हजार क्युसेक्स व मुळशी आणि पवना धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू केल्याने मुळा मुठा नदीला महापूर आला आहे.
नदीकाठावर विजवितरणचे दोन ट्रान्सफॉर्मर असुन त्याला पाणी लागल्याने ते बंद करुन ठेवले आहे. अनेक शेतकऱ्यांचे नदीवर पाणी उपसा करण्यासाठी शेती पंप (मोटारी) आहेत. पाणी वाढल्याने शेतकऱ्यांनी आपल्या मोटारी सुरक्षित स्थळी हलविले.
नदीकाठच्या घरांना पाणी लागले असुन सबमर्सिबल पुल पाण्याखाली गेला आहे. मांजरी खुर्दचे तलाठी सुधीर जायभाय, पोलीस पाटील भारती उंद्रे यांनी प्रत्यक्ष बाधित घरांना भेट देऊन परिस्थितीनुसार स्थलांतर करण्याचे आवाहन केले. तसेच प्रशासनाच्या वतीने ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Spread the love

Related posts

चुका वनस्पतीचे औषधी उपयोग…

admin@erp

मध आणि मनुका सोबत खाल्ल्याने होतात हे फायदे …

admin@erp

admin@erp