पुणेसामाजिक

मांजरी खुर्द आणि परिसरात धुंवाधार पाऊस

भाजीपाला पिकांचे नुकसान

प्रतिनिधी : – अशोक आव्हाळे

मांजरी ता.१९: मांजरी खुर्द व परिसराला पावसाने चांगलेच झोडपले. विजांच्या कडकडाटात मेघगर्जनेसह जोरदार वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणात गेले चार पाच दिवस संततधार तर शनिवार ,रविवार (ता.२५) रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास झालेल्या धुवांधार जोरदार पावसामुळे शेतमालासह मोठे नुकसान झाले आहे.
या पावसाने शेतात पाणी साचल्याने भाजीपाला पिकांचे नुकसान झाले.‌ या पावसामुळे शेतातील कामे बंद झाली आहे. या मान्सूनपूर्व पावसाने ओढे नाले खुळखळून वाहू लागले.
पावसाळा सुरू होण्यापूर्वीच पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे विहिरी बोरवेल यांची पाणी पातळी वाढली असून शेतकरी समाधानी झाला असला तरी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. दिवसभर सूर्याचे दर्शन झाले नाही. रविवार हा सुट्टीचा दिवस असून अनेक जणांनी या पावसामुळे घरीच बसणे पसंद केले आहे.

Spread the love

Related posts

बँकेचे शटर तोडून प्रवेशही केला मात्र रिकाम्या हाताने परतले.

admin@erp

महापालिकेची प्रारूप प्रभाग रचना पोहचली निवडणूक आयोगाकडे, इच्छुकांनो तयारीला लागा!.

admin@erp

तळेगाव ढमढेरे महाविद्यालयात महिला सबलीकरण कार्यशाळा.

admin@erp