प्रतिनिधी : – निलेश जगताप
शिरूर तालुक्यातील ऐतिहासिक गाव मलठण या ठिकाणी संत शिरोमणी सेना महाराज यांची पुण्यतिथी असंख्य मान्यवरांच्या व ग्रामस्थांच्या माता-भगिनींच्या उपस्थितीमध्ये सालाबाद प्रमाणे अतिशय उत्साहामध्ये व भक्तिमय वातावरणामध्ये तसेच ह. भ. प. श्रीराम महाराज घुले यांच्या हरी कीर्तनाने पुण्यतिथी सोहळा संपन्न झाला.
हा सोहळा मलठण येथील नाभिक संघटनेतील सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येऊन या सोहळ्याचे आयोजन केले. या सोहळ्यासाठी शिरूर तालुक्याचे माजी आमदार पोपटराव गावडे घोडगंगा सहकारी साखर कारखाना संचालक सुहासराव थोरात, माजी सरपंच विलासराव थोरात, दत्तोबा दंडवते, आनंदराव गायकवाड, किरण देशमुख, प्रकाश गायकवाड, गणपतराव क्षीरसागर, उपाध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र नाभिक मंडळ तसेच संदीप भाऊ गायकवाड, शंकर क्षीरसागर, बाळासाहेब नेवासकर, बाळासाहेब गायकवाड, सौ सुरेखा क्षीरसागर, महिला अध्यक्ष शिरूर तालुका नाभिक संघटना राजेंद्र आबा क्षीरसागर, बजरंग बाप्पू पडवळ, शंकर घुले तज्ञ संचालक किरण क्षीरसागर व मलठण परिसरातील माता-भगिनी व तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
यावेळेस हरिभक्त परायण श्रीराम महाराज घुले यांचे अतिशय सुंदर किर्तन संपन्न झाले. यावेळेस महाराजांनी सेना महाराजांचे चरित्र अतिशय सुंदर पद्धतीने आपल्या शैलीतून ग्रामस्था पुढे मांडली.
त्यानंतर माजी आमदार पोपटराव गावडे बोलताना म्हणाले की नाभिक समाज हा गावामध्ये सामाजिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये धाडसाने समाजामध्ये चांगल्या पद्धतीचे काम करत आहे, व गावाच्या विविध विकासामध्ये या समाजाचा अतिशय मोलाचा सहभाग सातत्याने आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना जाणवतो व आपल्या व्यवसायाची प्रामाणिक राहून लोकांच्या सुखदुःखामध्ये हा समाज सातत्याने वावरत असतो. त्यानंतर ते म्हणाले की भविष्यामध्ये जर संत सेना महाराजांच्या मंदिरासाठी जागा उपलब्ध करून दिली तर मंदिरासाठी लागणारा निधी देण्याचे काम निश्चितच भविष्यामध्ये आम्ही करू असा शब्द दिला. त्यांनी सर्व समाजाचे अभिनंदन व आभार व्यक्त केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप गायकवाड यांनी केले व सर्वांचे आभार नाभिकनेते गणपत शिरसागर यांनी केले व सर्वात शेवटी सर्वांनी महाप्रसादाला घेतला.
