पुणेप्रवासमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल…

प्रतिनिधी : – अशोक आव्हाळे

पुणे ता.२९ : पुणे आणि परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी या भागातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ६० (नाशिक फाटा ते खेड), राष्ट्रीय महामार्ग क्र. ६५ (हडपसर ते यवत) आणि राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४८ डी (तळेगाव–चाकण–शिक्रापूर) या तिन्ही प्रमुख राष्ट्रीय महामार्गांचं तातडीनं रुंदीकरण करावं, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्राद्वारे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली.

या तिन्ही महामार्गांवर शिक्षण संस्था, औद्योगिक पट्टा, वसाहती, रुग्णालये, पेट्रोलियम आणि वाहन उद्योग तसंच व्यापारी हब आहेत. यामुळे याठिकाणी वाहतुकीचा ताण प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे. रस्त्यांवर सतत वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असून वाहन चालकांच्या सुरक्षेवरही प्रश्न निर्माण झाल्याचे पत्राद्वारे कळविले आहे.

दरम्यान, सदर प्रस्तावास मान्यता देऊन आवश्यक निधी आणि प्रशासकीय मंजुरी तातडीनं मिळवून देण्याची विनंती गडकरी यांच्याकडे केली; जेणेकरून पुणे औद्योगिक परिसरातील वाहतूक समस्या दूर होण्यास मदत होईल असे अजित पवार यांनी म्हटले.

Spread the love

Related posts

तळेगाव ढमढेरे सरपंचपदी स्वाती लांडे बिनविरोध

admin@erp

गहाळ झालेले मोबाईल पोलिसांनी शोधून नागरिकांना केले परत..

admin@erp

मांजरी खुर्द व परिसरात बेकायदा होर्डिंगचा सुळसुळाट

admin@erp