प्रतिनिधी :- निलेश जगताप
शिक्रापूर :- मंगळवार दिनांक 19/8/2025 रोजी भैरवनाथ मंदिर शिक्रापूर येथे धन्वंतरी डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड बारामती व एच.व्ही.देसाई डोळ्यांचे हॉस्पिटल मोहम्मद वाडी हडपसर या दोन्हींच्या सौजन्याने ज्येष्ठांचे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. सदर कार्यक्रम शिक्रापूर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी पी.आय.मा.दीपरतन गायकवाड साहेब व शिक्रापूर ग्राम नगरीचे सरपंच मा.रमेश गडदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले सदर कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष डॉ.दिनकर कळमकर तसेच खजिनदार अर्जुन भाऊ शिर्के सचिव अशोक कुदळे व भैरवनाथ मंदिराचे अध्यक्ष राजाभाऊ मांढरे उपाध्यक्ष उत्तमराव गायकवाड तसेच ज्येष्ठ नागरिक संघाचे पदधिकारी बाळासाहेब शेंडे,वसंत तांबे,निवृत्ती जकाते,प्रभाकर मुसळे,सर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाला ग्रामस्थांकडून मोठा प्रमाणात जवळजवळ 250 हून अधिक ग्रामस्थांनी या शिबिराचा लाभ घेतला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.शिवाजी मचे सर यांनी केले व शेवटी गोड आभार प्रदर्शन श्री.बाबुराव साकोरे सर यांनी उपस्थित सर्वांचे मनापासुन आभार व्यक्त केले.
