तंत्रज्ञानपुणेमहाराष्ट्रशैक्षणिकसामाजिक

अण्णासाहेब मगर महाविद्यालयाची हडपसर पोलीस ठाण्यात सायबर सुरक्षा जनजागृती

सायबर सुरक्षा ही काळाची गरज : संजय मोगले

प्रतिनिधी :- अशोक आव्हाळे

मांजरी ता.२०: हल्ली सायबर गुन्ह्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून सायबर सुरक्षा ही काळाची गरज बनली आहे. चोरी, घरफोडी असल्या गुन्ह्यांपेक्षा सायबर हल्ले करून मोठ्या प्रमाणात लोकांची फसवणूक केली जात आहे. आणि या फसवणुकीस सुशिक्षित नागरिकही बळी पडत आहेत. त्यामुळे आपण वापरत असलेला मोबाईल सुरक्षित ठेवण्यासाठी अण्णासाहेब मगर महाविद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती उपक्रम राबवत आहे. हा उपक्रम जास्तीत जास्त नागरिकापर्यंत पोहोचवून जनजागृती व्हायला हवी असे प्रतिपादन हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांनी केले.

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयाच्या संगणकशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी हडपसर पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचाऱ्यांसाठी क्विक हिल फाउंडेशनच्या ‘सायबर सुरक्षेसाठी सायबर शिक्षण’ या उपक्रमाच्या माध्यमातून सायबर सुरक्षेविषयी जनजागृतीसाठी विशेष उपक्रमाचे आयोजन केले होते.

याप्रसंगी पोलीस निरीक्षक निलेश जगदाळे, पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप,पोलीस उपनिरीक्षक अनिल बिनवडे, पोलीस उपनिरीक्षक संभाजी नाईक, पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया कोलेवाड, समीर पांडुळे, डॉ. शंतनू जगदाळे, अण्णासाहेब मगर महाविद्यालयाचे प्राचार्य व व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ.नितीन घोरपडे, उपप्राचार्य अनिल जगताप, डॉ. नाना झगडे, मनीषा गाडेकर यांच्यासह महाविद्यालयाचे सायबर वॉरियर क्लबचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी आज प्रत्येकजण स्मार्टफोन आणि इंटरनेटचा वापर करत आहे, त्यामुळे सायबर गुन्हेगारांचे धोकेही वाढले आहेत. या धोक्यांपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे, हे प्रत्येकाला माहित असणे आवश्यक असल्याचे सांगितले.

महाविद्यालयाच्या ‘सायबर वॉरियर’ टीमने फिशिंग, रॅन्समवेअर, ऑनलाइन फसवणूक आणि सोशल मीडियावरील धोके यांसारख्या विविध सायबर गुन्ह्यांची माहिती दिली. तसेच, पासवर्ड सुरक्षित ठेवणे, अज्ञात लिंकवर क्लिक न करणे, आणि पब्लिक वाय-फायचा वापर करताना काळजी घेणे. यासह क्विकहिल अँटी फ्रॉड ॲप विषयी माहिती दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मनीषा गाडेकर यांनी केले तर डॉ. नाना झगडे यांनी आभार मानले.

Spread the love

Related posts

शिरूर तालुक्यातील करंजावणे येथे बिबट्याचा वावर..

admin@erp

युवा नेते राहुल दादा यांचा कामाचा धडाका 24 तासात दहिवडी उकले वस्ती ट्रान्सफर डीपी बसवण्यात यश.

admin@erp

गुरुपौर्णिमेनिमित्त रंगला ‘अनुग्रह ‘ कार्यक्रम

admin@erp